विद्यार्थ्यांनी घेतला ‘इलेक्ट्रॉनिक्स बुक्स’ आणि ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य प्रदर्शनाचा लाभ
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’ च्या ‘माजी विद्यार्थी संघटने’च्या वतीने आंतर महाविद्यालयीन ‘पुस्तक पुनरावलोकन’ (‘बुकरिव्हयू’) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंतरमहाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणारी अशा प्रकारची ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. ‘एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपि अँड रीसर्च’ च्या प्राचार्या डॉ. रोनिका अगरवाल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्राचार्य अनिता फ्रान्त्झ (‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’)उपस्थित होत्या.
या स्पर्धेमध्ये ‘डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट स्टडीज’ च्या स्वाती सुमन विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’च्या फातिमा मुजावर व ‘एम ए रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च’च्या सनोबर मीर ला मिळाले.
या स्पर्धे दरम्यान ‘इलेक्ट्रॉनिक बुक्स’ तसेच ‘ऑडिओ व्हिजुअल’ वाचन साहित्याचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते. याचा लाभ विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन ‘अॅल्युमनाय (माजी विद्यार्थी संघटना) असोसिएशन’च्या अंतर्गत ग्रंथपाल चंदा सुपेकर यांच्या सहाय्याने केले होते.
डॉ. स्नेहल कुलकर्णी (‘आबेदा इनामदार सिनीअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स’), डॉ. प्रीतम जैन (ए. के. के. न्यू लॉ अॅकॅडमी) आणि भावना शंकर (‘विवांता बाय ताज ब्लूडायमंड’, प्रशिक्षण व्यवस्थापक) यांनी या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले.