पुणे :
महाराष्ट्र आरोग्य -विज्ञान विद्यापीठ(नासिक ) चा १९ वा स्थापना दिन शनिवारी पुण्यातील एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात साजरा करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
दंत महाविद्यालयाचे निबंधक (रजिष्ट्रार ) आर ए शेख ,युनानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जालीस ,फिझीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रोनिका आगरवाल ,डॉ वर्षा शौरी ,डॉ रश्मी हेगडे ,डॉ कालिया ,गुलझार शेख ,डॉ अमिषा शाह उपस्थित होते