एमसीई सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा माजी केंद्रीयमंत्री अरीफ मोहम्मद खान यांच्या हस्ते झेंडावंदन
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’, आझम कॅम्पसतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आझम कॅम्पसच्या व्ही.एम.गनी स्पोेर्ट्स पॅव्हेलिनच्या क्रीडागंणावर सकाळी 9.00 वाजता भारताचे माजी केंद्रीयमंत्री अरीफ मोहम्मद खान यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार होते.
यावेळी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एन.सी.सी. पथक, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, स्कॉलर बॅच, गोल्डन ज्युबिली, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा, तैय्यबिय्या अनाथालय, ‘स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘आझम स्पोर्टस् अॅकडेमी’च्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय यांनी केले. यावेळी डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आबेदा इनामदार, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, काश्मीर, पंजाब आणि गोवा या राज्यातील वेषभूषा परिधान करून राष्ट्रीय एकतेचे प्रतिकेचे दर्शन घडविले व संपूर्ण परिसर ‘हम सब एक है’ या घोषणेने दणानून टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुमाना शेख, प्रा. दिवशाद सय्यद, प्रा. मजिद सय्यद व प्रा. गुलजार शेख यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले.