पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘इंडियन सोसायटी फॉर आर्ट अॅण्ड अॅनिमेशन’च्या वतीने नुकतेच एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. हा परिसंवाद आर्ट व अॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आणि शिक्षकवर्गासाठी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 120 विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘इंडियन सोसायटी फॉर आर्ट अॅण्ड अॅनिमेशन’चे अध्यक्ष प्रा.ऋषी आचार्य यांनी ‘उत्कृष्ठ ग्राफिक डिझायनर होण्याचे गुपित’ याविषयावर आधारित परिसंवादाची माहिती दिली. परिसंवादात झमीर हवालदार (‘इन्फिन्स्टा कन्सेप्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झमीर हवालदार यांनी ‘विद्यार्थ्यांना ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रातील काही गुपिते सांगितली. ज्यामध्ये टायपोग्राफी, रंगसंगती आणि फॉन्ट यांची निवड, कलाकाराच्या कामाची दिशा, एक व्यावसायिक ग्राफिक डिझायनर म्हणजे काय?, कलाकारातील प्रामाणिकता, मुलाखतीदरम्यान ग्राहकासमोर कशाप्रकारे आपली प्रतिमा सादर करावी’ याबाबत मार्गदर्शन केले.
या परिसंवादाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
‘भारतामध्ये मल्टिमीडिया आणि अॅनिमेशन उद्योग क्षेत्रामध्ये सर्जनशीलतेची गरज आहे. या क्षेत्रातील लोकांना ज्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करायची असेल अशांसाठी हे क्षेत्र नक्कीच उपयुक्त ठरते,’ असे मत प्रा.ऋषी आचार्य यांनी व्यक्त केले.

