पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजित आठव्या ‘ऑल महाराष्ट्र लेडी तेहेरून्निसा आंतरमहाविद्यालयीन त्रैभाषिक वक्तृत्व स्पर्धे’त ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (डिप्लोमा) महाविद्यालय सर्वसाधारण विजेतेपदाच्या चषकाचे मानकरी ठरले. डॉ. विजय नरखेडे (पुणे प्रदेश उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक) यांच्या हस्ते विजेत्या संघास पारितोषिके देण्यात आली.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांच्या आई लेडी तेहेरून्निसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा ‘एम.सी.ई सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय उर्दू, हिंदी आणि मराठी विभागाच्या वतीने नुकतीच आयाोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातून स्पर्धेमध्ये एकूण 36 महाविद्यालये सहभागी झाली होती.
या स्पर्धेमध्ये मराठी भाषा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शाहबाज मणियार (आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय), द्वितीय क्रमांक अशिया शेख, तृतीय क्रमांक नैतिक मोरे यांनी मिळविले. हिंदी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूजा रावल (आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय), द्वितीय क्रमांक मिसबाह शेख (एस. वाय. डी. फार्मसी), तृतीय क्रमांक मोहदखा पठाण (पूना कॉलेज) मिळविले. तर उर्दू भाषा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक झैनाद सिद्दकी (जे.ए.टी. कॉलेज, मालेगांव), द्वितीय क्रमांक एस.के.मिसबाह (ए आय आय सी), तृतीय क्रमांक अन्सारी अताउराहमन (आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय) यांनी पारितोषिके मिळविली. या पारितोषिकाचे स्वरूप पदक आणि रोख रक्कम असे होते.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदुम, सहसचिव प्रा. इरफान शेख, डॉ. व्हि.एन.जगताप (प्राचार्य, ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ -डिप्लोमा), डॉ. ई. एम. खान (प्राचार्य, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय), शैला बुटवाला (उपप्राचार्य, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय) यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

