महापौर साहेब,’राजकीय लाभाच्या हव्यासापोटी अधिकाऱ्यांना दमबाजी करणाऱ्यांना आवरा हो …. अरविंद शिंदे

Date:

पुणे- महापौर साहेब ,’राजकीय लाभ आणि बहुसंख्य लोकांत ‘हिरो ‘ (?) बनण्याचा हव्यास या पायी अधिकाऱ्यांना दमबाजी करणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधींना आवरा अन्यथा काम करणाऱ्या ,प्रामणिक अधिकाऱ्यांवर देखील अशा प्रकारांची दहशत बसेल आणि त्यांचे मनोधैर्य खचेल….. अशा आशयाचे आवाहन कॉंग्रेसचे माजी गटनेते,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आज महापौरांना लेखी पत्र देऊन केले आहे.

काय म्हटले आहे अरविंद शिंदे यांनी या पत्रात …

मा. महापौर ,पुणे

महोदय ,

सातत्याने गेले वर्षभर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनपाचा आरोग्य विभाग हा त्यांच्या कार्यरत क्षमतेपलीकडे कामकाज करत आहे. अनुभवी व प्रशिक्षित डॉक्टरांची अपुरी संख्या, तुटपुंजा नर्सिंग स्टाफ, रेमडिसीवर व अन्य आवश्यक इंजेक्शन्स यांचा तुटवडा, कोरोना लसींचा अपुरा साठा असणे अशा अनेक कमतरता असतानाही आरोग्य विभागाची यंत्रणा युध्द स्तरावर कार्यरत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासनाचे मनोधर्य अबाधित राहील यांची सर्वस्वी जबाबदारी
लोकप्रतिनिधींची देखील आहे. लोकप्रतिनिधींवर प्रभागातील नागरिकांचा कोरोनाबाबत सुविधा विषयक मागणीचा प्रचंड ताण असला तरीही जी यंत्रणा पुणेकरांच्या आरोग्याकरीता अहोरात्र धडपडत आहे तिला जबाबदार धरून वेठीस धरणे पूर्णतः अयोग्य आहे. आत्यकालीन परिस्थितीतच प्रशासनास सहकार्य करून त्यांचेकडून दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त करून घेणे लोकप्रतिनिधीच्या कौशल्याची बाब आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षंच्या लोकप्रतिनिधींकडून आरोग्य अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा दुर्दैवी प्रकार घडत आहे. अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन त्यांना दमबाजी करतानाचे फेसबुक लाईव्ह स्टंट करणे, लसीकरण कक्षाच्या श्रेयवादासाठी महिला आरोग्य अधिकाऱ्यांना अपमानस्पद वागणूक देत धमकाविणे, क्षेत्रिय महिला अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा टाकणे, कोव्हिड कक्षाच्या भोजन कक्षाच्या टेंडरसाठी आरोग्य अधिकाऱ्यांवर दबावतंत्र वापरणे असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने प्रशासनाचे मनोधैर्य निश्चितच खचलेले आहे. वाढत्या कोरोना रूग्ण समस्येशी सामना करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले असताना नगरसेवकाशी भांडण्यात प्रशासनाचा बहुमुल्य वेळ वाया जात आहे. कोरोना रूग्णांशी संवाद साधायचा का कोरोना रूग्णांची आरोग्य सेवा करायची का माननीयांच्या प्रश्नांच्या भडीमाराला तोंड द्यायचे या ब्दिधा मनस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी सापडले आहेत. या दवाब आणण्याच्या प्रकाराची नोंद शहरातील प्रसारमाध्यमे वर्तमानपत्रातून प्रसिध्द करत असल्याने पुणे मनपाची प्रतिमा देशभरात व नागरीकांच्यात मलिन होत आहे. महापौर या नात्याने नगरसेवकांच्या आक्षेपार्ह वर्तनास अटकाव करणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेचे मानसिक संतुलन ढासळू नये व नगरसेवक-अधिकारी यांच्यात सुसंवाद राहावा याकरीता आपण तातडीने पाऊले उचलावी आपण माझ्या पत्राची गांभिर्याने दखल घेताल, अशी अपेक्षा आहे.

आपला

अरविंद शिंदे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...