पुणे-गुन्हेगारीच्या संदर्भाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बेजबाबदार आणि चुकीची वक्तव्ये करीत आहेत. हा प्रकार त्यांनी त्वरीत थांबवावा,अन्यथा यापुढे त्याची किमंत तुम्हाला मोजावी लागेल, असा स्पष्ट इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना आज येथे दिला .महापौर तसेच सभागृहनेते गणेश बिडकर यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जगताप यांना हा इशारा दिला .
गेल्या काही दिवसांपासून भाजपा व राष्ट्रवादीत राजकारणातील गुन्हेगारीवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पाश्र्वभूमीवर जगताप यांनी महापौर मोहोळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारीचा आरोप केला. भाजपाच्या एका नगरसेवकावर वानवडी येथे गुन्हा दाखल झाला. यातील फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी महापौरांनी गुन्हेगाराला फोन करायला लावल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.त्यावर पहा आणि ऐका नेमके महापौर आणि सभागृह नेते काय म्हणाले……..