मातंग समाजाचा पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा

Date:

पुणे-आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मारक बचाव कृती समिती पुणे यांच्या वतीने पुणे महानगरपालिका शिवाजीनगर या ठिकाणी तमाम मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन कार्यक्रम मनपाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे म्हणाले कि, आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम ज्या जातीयवादी धर्मांध शक्ती मागील काही वर्षापासून सातत्याने करीत आहेत. त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. या राज्यमध्ये १९२५ पासून जातीयवाद रुजवण्याचे प्रयत्न काही राजकीय मंडळी करीत आहेत. त्याचीच पाले मुळे हे कटू कारस्थान करताना दिसत आहेत. भवानी पेठेतील वैद्य स्टेडीयम मध्ये सुमारे २७ वर्षापूर्वी कायदेशीर मार्गाने आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून लहूजी वस्ताद व्यायाम शाळा, बॉक्ससिंग प्रशिक्षण सेंटर, लहूजी टेनिस क्लब, योगासन वर्ग, कराटे क्लब असे विविध उपक्रम निरंतर सुरु आहेत. या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेऊन विविध जाती धर्माचे अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी अनेक पदके पटकावली आहेत. असे असताना केवळ आणि केवळ जातीय द्वेष भावनेतून लहुजींच्या नावाने असणाऱ्या संस्थेला व या कर्मभूमीला कलंकित करण्याचे पाप येथील भाजप करीत आहेत. हि बाब अत्यंत गंभीर असून पुण्यातील पुरोगामी चळवळीला खीळ घालण्याचे मोठे षडयंत्र आहे.

या ठिकाणी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा आहे. फुले, शाहू, आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे, मौलाना अब्दुल कलाम आझाद या महामानवांच्या विचाराने प्रभावित होऊन काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्र भरातून या पुतळ्यास अधिवादन करण्यास येतात. विशेषतः हि भूमी मातंग समाज व चळवळीला प्रेरणादायी आहे. सत्ताधारी पुणे मनपातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे क्रीडासंकुल बंद करा ते असेच पडून आहे. असा खोटारडा अपप्रचार करीत आहेत. हे त्यांचे दुषकृत्य मातंग समाज कधी सहन करून घेणार नाही. कायद्या पेक्षा कोणी मोठे नाही. पिवळ्या आणि निळ्या वादळात कुठे जाल हे दिसूनही येणार नाही. आमच्या नादाला लागू नका असा ईशाराही देण्यात आला.

तर दुसरीकडे बिबबेवाडी येथील साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या सभागृहाच्या मागील जागेत नियोजित सत्यशोधक मुक्ता साळवे यांच्या नावाने मागासवर्गीय मुलीसाठी सदर जागेवर वस्तीगृह बांधणेचा प्रस्ताव असून, सदर जागेवर स्विमिंग पूल बांधण्याचा आग्रह भाजपच्या कडून केला जात आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असेही बागवे म्हणाले. यावेळी मातंग समजाच्या शिष्ठ मंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा यांना या बाबतचे सविस्तर निवेदन देऊन चाललेला प्रकार त्वरित थांबविण्यात यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल याची वेळीच गाभिर्याने नोंद घ्यावी. असे शिष्ठ मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

या धरणे आंदोलन कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर अध्यक्ष श्री. संजय मोरे, दलित पॅन्थर शहर अध्यक्ष श्री. सुखदेव सोनावणे, भीम आर्मीचे प्रमुख श्री दत्ता पोळ, रिपब्लिकन युवा मोर्चाचे श्री राहुल डंबाळे, दलित कोब्रा संघटनेचे श्री भाई विवेक चव्हाण, रमाई प्रतिष्ठानचे श्री. विठल गायकवाड, शे.का.प.चे शहरअध्यक्ष श्री. सागर अल्हाट, शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. शाम देशपांडे, भाजपाचे नगरसेवक श्री. अशोक लोखंडे, पुणे मनपाच्या विरोधी पक्ष नेत्या दिपालीताई धुमाळ, भीम छावा संघटनेचे प्रमुख श्री. शाम गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रमुख श्री. सचिन आडेकर, नगरसेवक व मुस्लीम फाउंडेशनचे प्रमुख हाजी गफूर पठाण, मातंग RPI आघाडीचे प्रमुख श्री. हनुमंत साठे, लहूजी समता परिषदेचे अनिल हातागले,दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष राजू धडे, संगमवाडी येथील लहूजी स्मारक समितीचे अध्यक्ष बापू डाकले, मा.ना. नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, लहूजी शक्ती सेनेचे श्री. शंकर भाऊ तडाखे, तसेच मातंग समाजातील जवळ जवळ ५५ ते ६० विविध संघटनाचे प्रमुख त्याच बरोबर समाजातील महिला बंधू भगिनी या प्रसंगी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक श्री. प्रशांत जगताप, श्री. अविनाश बागवे, हाजी गफूर पठाण, हनुमंत साठे, शंकर तडाखे, अनिल हातगळे, सागर अल्हाट, सुखदेव सोनावणे यांचेही मार्गदर्शन पर भाषण झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मातंग एकता आंदोलनाचे शहर अध्यक्ष विठल थोरात, सौ सुरेखा खंडाळे, अरुण गायकवाड, गणेश शेंडगे, दयानंद अडागळे, सुनील बावकर, रोहित अवचिते, रईस कुरेशी, विलास कांबळे, नारायण पाटोळे, हुसैन शेख, डॉ. रमाकांत साठे, मारुती कसबे व इतरांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...