​​​​​​​उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

Date:

नवी दिल्ली-

उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांनी कंबर कसली असून, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विरोधकांची दिल्लीत बैठक झाली. त्यात विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर एनडीएकडून जगदीप धनकड यांना काल रात्री उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार असतील. 80 वर्षीय अल्वा या गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडचे राज्यपाल राहिल्या आहेत. त्यांच्या नावाची घोषणा विरोधकांच्या वतीने शरद पवार यांनी केली.

याआधी शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले होते. धनखर हा मूळचे राजस्थानमधील झुंझुनूचे आहेत. दिल्लीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनखड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...