बेळगाव – ‘मराठी टायगर्स ‘ हा चित्रपट हा सीमेवरच्या मातीतील माणसांचे म्हणणे आणि भावना मांडणारा चित्रपट आहे , भावना भडकाविणारा चित्रपट नाही कर्नाटक मध्ये बंदी घालण्याचा प्रयत्न म्हणजे दडपशाही च ठरेल . वणवा पेटणार … ठिणगी होण्याचं भाग्य ‘ मराठी टायगर्स ‘ ला लाभावं असे खणखणीत वक्तव्य अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केले आहे . आतापर्यंत सुरु असलेल्या ६० वर्षांच्या लढ्याला प्रतिनिधित्व देणारा हा सिनेमा आहे . हा सिनेमा ५ फेब्रुवारी रोजी सीमाभागात आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईलच .सिनेमात काही खोटे असेल अतिरंजित असेल तर पुराव्यानिशी सिध्द करून दाखवा असे आवाहन देत भाजपचे नाव न घेता कोल्हे यांनी म्हटले कि , ज्या पक्षाचे सरकार कर्नाटक मध्ये आहे हाच पक्ष दिल्लीत असहिष्णुता इन्तोलारंस, इन्तोलारंस असे गळे काढतो , तेव्हा त्या पक्षाने खरोखर याचे उत्तर द्यावे कि हा इन्तोलारंस नाही काय ? उगाच पाकिस्तानातील गुलाम अलीची स्वागतं करून त्यांना गळा भेटी घेवून नंतर पठाण कोट ला गोळ्या घेण्यापेक्षा कोणती गोष्ट जास्त सोयीची आहे जास्त चांगली आहे कि इथल्या मातीतल्या माणसांची भाषा ,वेदना आणि व्यथा संपूर्ण जगासमोर यावी . आहे ते समोर येवू नये म्हणून जर दडपशाही करीत असाल तर जे कोणी विरोध करतील त्यांचा दुटप्पीपणा आणि बुरखा हा फाडला जातोय म्हणून ते करत असल्याचे स्पष्ट दिसेल.
दरम्यान बेळगाव , कोल्हापूर नंतर मंगळवारी डॉ. अमोल कोल्हे यांच्या याच विषयावरील पुण्यातील पत्रकार परिषदेकडे आता अनेकांचे लक्ष लागून आहे .