मुंबई-भारतीय स्टेट बँकेच्या केंद्रीय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.
यावेळी कर्मचाऱ्यांसाठी २स्पर्धा घेण्यात आल्या.कर्मचाऱ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण व्हावी यासाठी ६अक्षरी मराठी शब्द लिहिणे व अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली .
गुरुवार दि २८ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेतील पुढील पुरस्कार विजेत्या
प्रथम -रिमा गवंडळकर
द्वितीय -अमृता मोडक
तृतीय – अनुप्रिता बिर्जे
तर उत्तेजनार्थ पुस्कार
सरिता डिसूझा
सुभाषिनी दीपक
चित्रा कर्वे
यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले
अभिवाचन स्पर्धेचे परीक्षक पत्रकार शीतल करदेकर व हेमंत सामंत होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे उपस्थित होते.यावेळी कर्मचा-यांनी नी मराठी गौरव गीत श्रुती अय्यर व छोट प्रहसन स्मिता भट यांनी सादर केले.
या कार्यक्रमास केंद्रीय कार्यालयाचे मुख्य महा प्रबंधक संदीप उबाळे ,महा प्रबंधक पूर्ती तसेच युनियनचे विभाग अधिकारी सुरेंद्र गावकर , समृध्दी ओवळेकर,स्नेहल जाधव,वाचनालय सचिव ऋषिकेश अभ्यंकर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृध्दी ओवळेकर, प्रास्ताविक शिबानी जोशी यांनी तर आभार ऋषिकेश अभ्यंकर मानले.