पुणे- निर्मात्यांपासून स्पॉटबॉय पर्यंत भारतीय सिनेमात योगदान देणाऱ्या 17 कलावंतांचा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने चित्रकर्मी पुरस्कार पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे . चित्रकर्मी पुरस्कार सोहळा येत्या २४ जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे . संचालिका निकिता मोघे या सोहळ्याचे दिग्दर्शक माधव अभ्यंकर ,खजिनदार संजय ठुबे,समारंभ समिती प्रमुख गिरीश कोळपकर आदी या समारंभाचे नियोजन करीत असून यंदा पहिल्यांदाच समारंभाचे काम इव्हेंट कंपनीकडे देण्यात आलेले नाही . याबाबत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिलेली माहिती (पहा व्हिडीओ)