पुणे(अभिषेक लोणकर )- एकीकडे अलका कुबल आणि प्रिया बेर्डे या दोघी अभिनेत्रींनी आता या महामंडळाच्या संचालक पदापासून दूर राहणे पसंद केले असताना ; दुसरीकडे अभिनेता म्हणून लोकप्रियता प्राप्त असले तरी विजय पाटकर यांच्या कारकीर्दीवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्यांनी या निवडणुकीत पॅनल करताना संबधित प्रमुखांनी लोकप्रिय चेहऱ्यांचा-सिलेब्रीटीन्चा पुरेपूर वापर करून घेण्याचे ठरविले आहे . त्या दृष्टीने सुशांत शेलार -वर्षा उसगावकर ; मिलिंद गवळी -पूजा पवार ;विजय पाटकर – निवेदिता सराफ ; दिपाली सय्यद असे लोकप्रिय चेहरे या निवडणुकीत दिसणार आहेत . सिलेब्रिटी केवळ शो पीस -आणि गर्दी जमविण्यासाठी असतात असे यापूर्वीच्या संचालक मंडळावर टीका करताना बोलणारे हि याबाबत मागे राहिलेले नाहीत .विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदार हा सामान्य माणूस -रसिक प्रेक्षक नसून सिनेसृष्टीशीच निगडीत असलेलाच असणार आहे हे विशेष …
पाहू यात अन्य लढती कशा असतील ….
अभिनेत्री विभाग
१)पूजा पवार -कपबशी
२)अर्चना नेवरेकर-रिक्षा
३)निवेदिता अशोक सराफ -समई
४)वर्षा उसगावकर -पतंग
5)दिपाली सय्यद -विमान
6)संध्या वेल्हाळ -मशाल
७)दीपज्योती नाईक-छत्री
८)सुरेखा शहा- सायकल
———————–
निर्मिती व्यवस्था
१)अशोक जाधव – कपबशी
२)दिलीप दळवी -रिक्षा
३)रत्नकांत जगताप -समई
४)संजय ठुबे-पतंग
5)बाळासाहेब गोरे -विमान
6)बाबासाहेब पाटील-मशाल
७)शिवाजी ससाणे-छत्री
८)नाथानियाल शेलार-उगवता सूर्य
९)किशोर सुतार-सायकल
१०)मिलिंद अष्टेकर- तराजू
११)मनोज उदय मराठे -रेडिओ
—————————-
कामगार
१)मधुकर पाटील-कपबशी
२)सागर तेलके -रिक्षा
३)बाळकृष्ण बारामती -समई
४)रणजीत जाधव -पतंग
5)आदिलशहा मुल्ला -विमान
6)संजय टेमबरे-मशाल
७)कृश्नांत जाधव -छत्री

