पुणे -मराठी बांधकाम व्यावसायिकांनी राज्यातील गड-किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योगदान द्यावे असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.महाराष्ट्र स्तरावरील ‘मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघा’ची स्थापना आज येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ते बोलत होते .
या कार्यक्रमातील महत्वाचे मुद्दे
गड किल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. रायगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या समुद्रातील किल्यांसह विकास करा, सर्व सरकार करू शकत नाही. फोर्ट फाऊंडेशन स्थापन केले आहे. तुम्ही सर्वांनी तेथे सहभाग घ्यावा. किल्ले संवर्धन मोहिमेचे घटक व्हावे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
बांधकाम व्यवसायात कला आणि संस्कृती आहे. ही कल्पना छोट्या तालुक्यात राबवू शकतो. म्हणजे तेथील तरुण नोकरीसाठी बाहेर जाणार नाही.
व्यवसाय करताना कला, संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आपण वेगळ्या पद्धतीने काम केले पाहिजे.
संभाजी महाराज म्हणाले, मराठी किंबहुना भूमिपुत्र व्यापक दृष्टिकोन ठेवून सर्व एकत्र आले आहेत.
तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील. त्याला ताकद कशी देता येईल,
गरीब मराठी समाजाला असुरक्षित वातावरणातून कसे बाहेर काढता येईल, छोट्या शहरातील मुलांना कशी मदत करता येईल याचा विचार केला पाहिजे.महाराष्ट्रासाठी मराठी बांधकाम व्यावसायिकांच्या महासंघाची स्थापना आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संभाजीराजे बोलत होते. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सतिश मगर, महासंघाचे नवर्निवाचित चेअरमन डॉ. सुरेश हावरे, अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. अजित मराठे, गजेंद्र पवार, सचिव प्रकाश बाविस्कर, सहसचिव संदीप कोलटकर, खजिनदार बाबासाहेब भोसले, सहखजिनदार प्रमोद पाटील, नंदकुमार घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्यांना किफायतशीर दरात घरे उपलब्ध करून देणे, व्यावसायिकांचे प्रश्न सोडविणे, सरकार दरबारी संघटनेचे प्रश्न मांडणे, व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन करणे ही मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाच्या स्थापनेमागील भूमिका असल्याची माहिती हावरे यांनी आपल्या भाषणात दिली.
सतीश मगर म्हणाले, कोणाच्या दावणीला बांधू नका. महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी काम करा. भूमिपुत्रांनी उद्दिष्ट पूर्ण करा. व्यवसायात राजकारण आणू नका.
मराठी माणूस एकटा पडू नये, त्याच्या मागे संघटनेचे पाठबळ असावे, तो संघटित असावा, तो रोजगार देणारा असावा, त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे, व्यवसाय टिकला पाहिजे, नवीन व्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने राज्यासाठी महासंघ कार्यरत राहणार असल्याची माहिती एस. आर. कुलकर्णी यांनी दिली.
टाउनशिप आणि नॅनो हाउसिंग या विषयांवर सतीश मगर आणि सुरेश हावरे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. राजेंद्र आवटे आणि मिलिंद देशपांडे यांनी मुलाखत घेतली.

