पुण्यात घोंगावले भगवे वादळ .. मराठा मोर्चात राजकीय नेत्यांसह लाखोंचा सहभाग(व्हिडीओ आणि फोटो )

Date:

(व्हिडीओ यू ट्यूब वर ही उपलब्ध आहे )

dipak

w w1

1

img-20160925-wa0012img-20160925-wa0014img-20160925-wa0017img-20160925-wa0018img-20160925-wa0019img-20160925-wa0020img-20160925-wa002114359203_1780119742244419_1675203327972023736_n 14457260_1079216368814073_6510721599693413861_n 14462754_1133037593456582_9137935757488733590_n 14492464_1079217162147327_8782632127040324654_n a1 a2 a3 a4 a5 a6
पुणे- आज (रविवारी) पुण्यात डेक्कन येथील गरवारे पुलावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अतिभव्य अशा मराठा मूक मोर्चास प्रारंभ झाला. गर्दीच्या महासागरास उधाण आले होते . जणू पुण्यात आज सकाळी दुपारपर्यंत भगवी लाटच अवतरली होती .मोर्चातील तरुणींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली .
प्रारंभी काश्मीरमधील उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तरुणींच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून मूक मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्ता, सिटी पोस्ट, संत कबीर चौक, नाना पेठ क्वार्टर गेट, हॉटेल शांताईमार्गे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद कार्यालयासमोरून हॉटेल ब्लू नाइल मार्गे विधान भवन चौकात नेण्यात आला .
मोर्चासाठी पहाटे पाचपासून डेक्कन परिसर आणि जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या संख्येने सकाळी ९ वाजेपर्यंत नागरिक सहभागी झाले होते . तरुणापासून वयोवृद्धपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नियोजन बद्ध मोर्चाचे आयोजन गेले आहे. हातात झेंडे घेऊन नागरिक सहभागी झाले . मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून लोकं आले .
यामध्ये विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते सहभागी झाले. . मोर्चाच्या अलका चौकात सुनेत्रा पवार आणि  माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी विरोधी पक्षनेता दत्ता सागरे यांनी मिडियाचे लक्ष वेधून घेतले . धावपटू ललिता बाबर, उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी झाले . मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी ललिता बाबर आणि उदयनराजे भोसले यांनी मोर्चात आपली मते वाहिन्यांच्या कॅमेरयापुढे व्यक्त केली.अजित पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता मोर्चात सहभागी होणे पसंद केले खासदार उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबरच स्थानिक नेते, नगरसेवकही मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यात सर्वच प्रमुख पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. महापौर प्रशांत जगताप,माजी गृहराज्यमंत्री ,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे  कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम,अजित दरेकर ,राजलक्ष्मी भोसले . शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे आदीही मोर्च्यात आले होते. माजी खासदार अशोक मोहोळ, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश काकडे, चेतन तुपे, विकास दांगट आदींचाही त्यात समावेश होता.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जन सुरक्षा अधिनियम, २०२४ मधील तरतुदींविरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जोरदार निदर्शने

पुणे- महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम, २०२४ मधील तरतुदींविरोधात...

ठाणे कि रिक्षा संकटमोचक ..पुण्यातून कामराच्या विडंबनाला असेही उत्तर

पुणे- कॉमेडीयन कुणाल कामरा चे विडंबन त्यातून केलेली उपमुख्यमंत्री...

खरगे म्हणाले- माझ्याकडे वक्फची 1 इंचही जमीन नाही:अनुराग ठाकूर यांनी आरोप सिद्ध करावेत, नाहीतर राजीनामा द्यावा

वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादरनवी दिल्ली-राज्यसभेतील विरोधी पक्षनेते...