पुणे :
एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ‘मध्ये ८ ऑकटोबर हा ‘ इंटरनॅशनल बेकर्स डे ‘ म्हणून साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांनी पाव आणि बेकिंग च्या विविध प्रकारच्या रेसिपी तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला . विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली . हयात रिजेन्सी चे एक्झिक्युटिव्ह शेफ राजदीप शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी स्वागत केले . ‘ हॉटेल व्यवसायात कष्ट आणि झोकून देण्याची वृत्ती आवश्यक असते ,त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत ‘ असे प्रतिपादन राजदीप शर्मा यांनी केले