मुंबई-
नवाब मलिक यांनी म्हटलंय की, तीन तारखेच्या रात्री मुंबई गोवा क्रूझ पाण्यात असतानाच त्याच्यावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर सांगण्यात आलं की यात बड्या स्टारचा मुलगा आहे. यामध्ये ज्या लोकांना ताब्यात घेतलं त्यांचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला. एक टकला व्यक्ती ताब्यात घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर हाच व्यक्ती एका सेल्फीमधून व्हायरल झाला. त्याचा आर्यन खानसोबत हा फोटो दिसून आला. एएनआयने अशी बातमी दिली की, हा एनसीबीचा अधिकारी नाहीये. तर हाच मोठा प्रश्न आहे की, हा कोण आहे. जर तो अधिकारी नसेल तर एखाद्याला ताब्यात कसं घेऊन जाऊ शकतो? या व्यक्तीचं आणि एनसीबीचं काय कनेक्शन आहे हे एनसीबीने स्पष्ट करायला हवं.
एएनआयने असा व्हिडीओ रिलीज केला की ज्यामध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाताना दिसून आलं. पहिल्या व्यक्तीचं नाव आहे के पी गोसावी तर मनिष भानुसाली हे दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तोही एनसीबीचा अधिकारी नाहीये. तर तो भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याचा फोटो देशाच्या पंतप्रधानासोबत फोटो आहे, अमित शहांसोबत आहे. देवेंद्र फडणवीसासोबत आहे. गुजरातच्या अनेक नेत्यांसोबत आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत आहे. एनसीबीने हे स्पष्ट करावं की, हे दोघे कोण आहेत आणि यांचा तुमच्याशी काय संबंध आहे?
जे जप्त केले त्याचे फोटो जाहीर करण्यात आला. बातमी अशी प्लांट केली की, क्रूझवरुन लोकांना ताब्यात घेतलं. तसेच हे तिथून जप्त करण्यात आल्याचा दावा केला गेला. मात्र हे फोटो क्रूझवरचे नसून दिल्ली ऑफिसमधील आहेत, असा दावा मलिक यांनी केलाय. छापेमारीची एक प्रोसिजर असते. जे काही जप्त केलंय त्याला जप्त करण्याची प्रक्रिया असते. क्रूझवर काहीही जप्त करण्यात आलं नसल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होतंय, असा दावा त्यांनी केलाय.
खालील प्रश्नांची द्यावीत उत्तरे
मलिक यांनी म्हटलंय की, एकतर हे प्रकरण बनावट आहे, किंवा या एनसीबीने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
- गोसावीचं एनसीबीचं नातं काय
- जर एनसीबीचा अधिकारी नसेल तर तो एखाद्याला कसा ताब्यात घेऊन जातो आहे
- एनसीबीला हा अधिकार आहे का, की खासगी लोकांना घेऊन अशी कारवाई करावी, असेल तर ती कोणत्या अधिकाराअंतर्गत?

