Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मालविका, कौशलने पटकावले विजेतेपद -व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा

Date:

पुणे : महाराष्ट्राच्या मालविका बनसोड आणि कौशल धर्मामेर यांनी पुणे जिल्हा अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना आयोजित वरिष्ठ गटाच्या व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
शिवाजीनगर येथील मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित मालविकाने गुजरातच्या बिगरमानांकित अदिता  रावला १३-२१, २१-१७, २२-२० असे पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत एक तास आणि तीन मिनिटे चालली. 


मालविकाला या स्पर्धेत सुरुवातीपासूनच जेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात होते. नुकत्याच गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला महिला एकेरीचे उपविजेतेपद मिळाले होते. गुजरातच्या अदिती रावने पात्रता फेरीतील तीन लढती जिंकून मुख्य फेरी गाठली होती. मुख्य फेरीतही तिने मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे अंतिम लढतीत चुरस अपेक्षित होती. अदिती रावने पहिल्या गेममध्ये जबरदस्त सुरुवात केली. स्मॅशचा अचूक वापर आणि नेटजवळ सुरेख खेळ करून तिने पहिली गेम जिंकली. मालविकाला सुर गवसायला वेळ लागला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये मालविकाने दमदार पुनरागमन केले. तिने फटक्यांमध्ये अचूकता राखली. निर्णायक क्षणी मालविकाने आपला खेळ उंचावून दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली. तिसरी गेम अतिशय चुरशीची झाली. दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. दोघीही सहजासहजी गुण बहाल करीत नव्हत्या. मात्र, २०-२०  अशा बरोबरीनंतर मालविकाने सलग दोन गुण घेऊन गेमसह लढत जिंकली. विजयानंतर मालविका म्हणाली, की या स्पर्धेतील विजेतेपदाचा विश्वास होता. मात्र, मी कुठेही गाफील राहिले नाही. प्रतिस्पर्ध्याचा विचार न करता स्वत:च्या जमेच्या बाजूंवर विश्वास राखून खेळले. अदितीने चांगली लढत दिली. मी तिच्याविरुद्ध पहिल्यांदाच खेळत होते. वरिष्ठ गटाचे जेतेपद नेहमीच आनंददायी असते. या स्पर्धेत खेळण्याचा आनंदच वेगळा असतो.  
मालविका व्ही. व्ही. नातू स्मृती स्पर्धेत दुसऱयांदा खेळत होती. याआधी ती २०१९ मध्ये सहभागी झाली होती. त्या वेळी तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मालविकाचे हे वरिष्ठ गटाचे चौथे विजेतेपद आहे. 
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कौशलने महाराष्ट्राच्याच रोहन गुरबानीला २१-१०, २१-१६ असे नमविले. ही लढत ३६ मिनिटे चालली. दोन्ही गेममध्ये कौशलने रोहनला फारशी संधीच दिली नाही. पहिली गेम एकतर्फीच झाली. दुसऱ्या गेममध्ये रोहनने आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कौशलने त्याला ही संधी मिळू दिली नाही. विजयानंतर मुंबईचा कौशल म्हणाला, की माझ्यासाठी हे विजेतेपद खास आहे. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले.
खुशी गुप्ताला दुहेरी मुकुट
दिल्लीच्या खुशी गुप्ताने दुहेरी मुकुट मिळवला. तिने महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत खुशीने तेलंगणच्या सिद्धार्थ एलान्गोसह खेळताना अरविंद सुरेश -पवित्रा नवीन या केरळच्या जोडीवर २१-१९, २१-१५ अशी मात करून जेतेपद पटकावले. यानंतर महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत खुशीने मणिपूरच्या प्रिया देवीसह खेळताना शिखा गौतम (कर्नाटक) -पूर्विशा एस. राम (आरबीआय) जोडीचा २१-१७, १७-२१, २१-१२ असा पराभव करून जेतेपद निश्चित केले. पुरुष दुहेरीत अग्रमानांकित तामिळनाडूच्या हरिहरन अमसकरुनन-रुबनकुनार आर. जोडीने महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे-विराज कुवळे जोडीवर २१-१८, २१-१६ अशी मात करून विजेतेपद पटकावले.
विजेत्यांना क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, लोकमान्य मल्टीपर्पजचे सुशील जाधव, पीएनजी सन्सचे अमित मोडक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजित नातू, आयोजन समिती सचिव राजीव बाग, अविनाश जाधव, सारंग लागू, डॉ. संजय पुरंदरे उपस्थित होते. विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. यात एकेरीतील विजेत्यांना ४८,७०० रुपये आणि करंडक, उपविजेत्यांना २४,८०० रुपये देऊन गौरविण्यात आले.  दुहेरीतील विजेत्यांना ५१,३०० आणि उपविजेत्यांना २४,८०० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...