Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘महिंद्रा ची जुलै 2020मध्ये 24,463 ट्रॅक्टर्सची भारतात विक्री

Date:

विक्रीमध्ये 28 टक्क्यांची वाढ

मुंबई1 ऑगस्ट2020 : 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि. या कंपनीच्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे (एफइएस) जुलै 2020 या महिन्यातील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी आज घोषित करण्यात आली. तीनुसार, जुलै 2020 मध्ये या ब्रॅंडचे 24,463  इतके ट्रॅक्टर देशात विकले गेले. 2019 च्या जुलैमध्ये ही संख्या 19,174 होती. जुलै 2020 मध्ये ट्रॅक्टरची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) 25,402 इतकी होती. मागील वर्षी याच काळात ती 19,992 होती. जुलै 2020 मध्ये 939 इतक्या ट्रॅक्टरची निर्यात झाली.

या कामगिरीबद्दल टिप्पणी करताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रेसिडेंट हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही जुलै 2020 मध्ये देशांतर्गत बाजारात 24,463 ट्रॅक्टर विकले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीत 28 टक्के वाढ झाली आहे. जुलै या महिन्यातील ही आमची सर्वात जास्त झालेली विक्री आहे. या महिन्यात मागणी जोरदार होती. शेतकऱ्यांकडील पैशाची उपलब्धता,  खरिपाची जास्त पेरणी, जून व जुलैमध्ये वेळेवर झालेला व सामान्य स्वरुपातील मान्सून आणि सरकारने ग्रामीण भागातील खर्चात केलेली वाढ यांमुळे सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. काही राज्यांमध्ये अजूनही स्थानिक स्तरावर टाळेबंदी, तसेच ‘कोविड-19’चा विशिष्ट पुरवठादारांच्या कामावर परिणाम, यांमुळे या महिन्यात अनेक आव्हाने उभी राहिली. मात्र बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम टिकून पुढील काही महिन्यांमध्ये ट्रॅक्टरला मागणी जोरदार राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाजारामध्ये आम्ही 939 ट्रॅक्टर विकले आहेत, त्यातही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे.’’

फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफडी + एसडी + ग्रोमॅक्स)
 जुलैसंचयित जुलै
 वर्ष 20वर्ष 21वाढ (टक्के)वर्ष 20वर्ष 21वाढ (टक्के)
देशांतर्गत विक्री19174244632810208789040उणे 13
निर्यात8189391542552019उणे 53
एकूण19992254022710634291059उणे 14

*निर्यातीमध्ये सीकेडी समाविष्ट

’महिंद्रा’बद्दल

महिंद्रा समूह हा 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे. हा समूह लोकांना नवीन समृद्ध ’मोबिलिटी सोल्यूशन्स’ देऊन ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान वाढविण्यास मदत करतो.  नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो. भारतात युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे. महिंद्र ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपारीक उर्जा, कृषी व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे. भारतातच मुख्यालय असलेला  महिंद्र उद्योग समूह 100 देशांमध्ये 2,56,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...

“महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करा; शासन तुमच्या पाठीशी आहे— डॉ. नीलम गोऱ्हे”

चंद्रपूर, दि. ११ : नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना...

जलसंधारण खात्याचा आकृतीबंध न उठल्यास संजय राठोडांना छत्रपती संभाजीनगरात प्रवेशबंदी!

वाल्मी येथील रोजगार सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा छत्रपती संभाजीनगर :राज्यातील लाखो...