महिंद्रातर्फे ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप सादर

Date:

पुणे, १० ऑगस्ट २०२२: वजनाने हलक्या व्यावसायिक वाहन विभाग (LCV)- २ ते ३.५ टन श्रेणीतील अग्रेसर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) ने आधुनिक भारताच्या वाहतूक आणि पुरवठ्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातील पिकअप्स श्रेणीतील नवीन ब्रँड बोलेरो मॅक्स पिक-अप सादर करत असल्याची घोषणा केली. कंपनीने बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी ३००० सादर करून ब्रँडचे अनावरण केले. बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी ३००० आकर्षक वित्त योजना आणि डाऊन पेमेंट २५,००० सह 7,68,000 रुपये किंमतीच्या (एक्स-शोरूम) पासून पुढे आहे.

वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक काळातील व्यवसायांच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी महिंद्रा पिकअप विभागामध्ये एक नवीन ब्रँड सादर करत आहे. बोलेरो मॅक्स पिक-अप हा महिंद्राचा एक नवीन ब्रँड आहे, जो पिकअप विभागामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी अभियांत्रिकी आणि डिझाइन केलेला आहे.  या नवीनतम पिकअप ब्रँड मध्ये प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान iMaXX टेलिमॅटिक्स सोल्यूशन आहे. त्यामुळे प्रभावी वाहन व्यवस्थापन सक्षम होते आणि व्यवसाय उत्पादकता वाढते. सेगमेंट-अग्रणी आराम आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये लांब मार्गांवर ड्रायव्हरची सोय सुविधा पुरवितात. नवीन फ्रंट ग्रील (लोखंडी जाळी), नवीन हेडलॅम्प आणि डिजिटल क्लस्टरसह प्रीमियम नवीन डॅशबोर्ड यांसारखी प्रीमियम डिझाइन वैशिष्ट्ये व्यावसायिकांना आपण खूप चांगल्या वाहनाचे मालक असल्याचा अभिमान मिळवून देतील.

गेल्या २२ वर्षांपासून पिकअप विभागातील अग्रणी म्हणून महिंद्राने सातत्याने आपल्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि कामगिरी, विश्वासार्हता, कमी देखभाल, आणि उच्च पेलोड क्षमता, ग्राहकांना यशस्वी व्यवसायांसाठी जास्तीत जास्त नफा मिळविण्यास सक्षम करणे यासारख्या श्रेणीशी संबंधित मापदंडांवर सातत्याने उद्योगक्षेत्रातील मापदंड प्रस्थापित केले  आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजन अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “महिंद्रा मध्ये आम्ही ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांना अधिक कमाई करून देत  समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप हा एक भविष्यवादी ब्रँड असून प्रगत iMAXX तंत्रज्ञान, टर्न सेफ लाईट्स, उंची समायोजित करता येण्याजोगे आसन, शक्तिशाली आणि कार्यक्षम इंजिन, श्रेणीतील अग्रगण्य पेलोड क्षमता यासारख्या श्रेणीत पहिल्यांदाच असलेल्या अनेकानेक वैशिष्ट्यांनी हा ब्रँड भरलेला आहे.  पिकअप विभागामधील या नवीन मापदंड ब्रँडसह महिंद्राने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांचे अमूल्य हित जपण्याचा आपला उद्देश आणि क्षमता प्रदर्शित केली आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, “आमचे नवीनतम सादरीकरण ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप ची अभियांत्रिकी ही पिकअप बाजारपेठेच्या उच्च मागणी, नेहमी विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी  केलेली आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसवर होस्ट केलेल्या iMAXX कनेक्टिव्हिटी ऑफरिंगसह आम्ही ती सुसज्ज केली आहे. त्यात अतुलनीय तंत्रज्ञान वैशिष्ट्ये असून ती ग्राहकांना त्यांच्या मालमत्तेचे अधिक चांगल्या प्रकारे परीक्षण करण्यास  मदत करते. ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिक अप सिटी 3000 शक्तिशाली ड्राईव्हट्रेनसह सुसज्ज आहे आणि १३०० किलोग्रॅमची उच्च पेलोड क्षमता आहे. आणि तरीही १७.२ किमी/ली* ची अतुलनीय इंधन कार्यक्षमता देते. पिकअपमधील या नवीन मापदंडासह महिंद्राने पिकअप विभागात क्रांती घडवून आणण्याचा आपला उद्देश आणि क्षमता पुन्हा एकदा प्रदर्शित केली आहे.”

बोलेरो मॅक्स पिक-अप बद्दल

बोलेरो मॅक्स पिक-अप मध्ये प्रगत iMAXX टेलीमॅटिक्स सुविधा आहे. त्यामुळे नूतन व्यवसाय मालकांना व्यवसाय उत्पादकता सुधारण्यासाठी आणि कामकाज खर्च कमी करण्यासाठी वाहन टेलिमॅटिक्स आणि ऑन-बोर्ड वाहन डायग्नॉस्टीक्स करण्यात सक्षम करते. मोबाइल अॅपवर उपलब्ध असलेल्या ३०+ पेक्षा जास्त वैशिष्ट्यांसह, iMAXX टेलिमॅटिक्स सुविधा व्यवसाय मालकांना वाहन आरोग्य आणि कामगिरीबद्दल शक्तिशाली ज्ञान मिळविण्यासाठी आणि MLO आणि फ्लीट ऑपरेटरना मार्ग नियोजन, वितरण शेड्यूलिंग, नेव्हिगेशन, वाहन ट्रॅकिंग, जिओफेन्सिंग, इंधन लॉग, आणि इतर वैशिष्ट्यांमध्ये मदत करते.

ड्रायव्हरच्या आराम आणि सुरक्षिततेवर भर देण्यासाठी बोलेरो मॅक्स पिक-अप मध्ये या श्रेणीतील  असंख्य वैशिष्ट्ये भरलेली आहेत. अथक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ऊंचीला अनुसरून हलवता येणारे ड्रायव्हर सीट देणारे हे भारतातील पहिले पिकअप आहे. हेडरेस्ट आणि उच्च लेगरूमसह प्रमाणित D+2 आसनव्यवस्था जास्तीत जास्त आराम देते. श्रेणीतील पहिले टर्न सेफ लाईट्स, एलईडी टेल लॅम्प आणि फ्रंट बोनेट यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये ड्रायव्हरची जास्तीत जास्त सुरक्षितता सुनिश्चित करतात.

५.५ मीटर टर्निंग रेडियसने सुसज्ज बोलेरो मॅक्स पिक-अप कोणत्याही रहदारीच्या रस्त्यावर, शहराच्या अरुंद गल्ल्या मधून आणि फ्लायओव्हर्सवरही आरामात जाऊ शकते. याचे कॉम्पॅक्ट आटोपशीर डिझाईन शहरांतर्गत रस्त्यांसाठी आणि आंतरशहरांमध्ये वाहतुकीसाठी योग्य बनवते.

बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी 3000 हे १७.२ किमी/ली असे अग्रणी मायलेज देत मॅक्स नफा मिळवून देण्यासाठी इंजिनिअर  आणि डिझाइन केलेले आहे. इंधनाच्या किंमती खूप वाढल्यामुळे संवेदनशील झालेल्या आजच्या बाजारपेठेत हे खूप महत्वाचे आहे. महिंद्राचे विश्वसनीय m2Di इंजिन  १९५ एनएमचा उत्कृष्ट टॉर्क आणि ४८.५ किलोवॅट (६५ एचपी) पॉवर देते.

शहरी वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी 3000 मध्ये १३०० किलोची पेलोड क्षमता असून या श्रेणीतील सर्वात विस्तृत कार्गो परिमाणे १७०० एमएम ओव्हर स्लंग सस्पेंशन आहे आणि उत्तम लोडिंग स्टॅन्ससाठी श्रेणीतील सर्वोत्तम आर १५ टायर्स आहेत. याव्यतिरिक्त, त्याची कमी ऑपरेटिंग किंमत ग्राहकांसाठी बचत आणि उत्पन्न वाढवते.

बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी 3000 गोल्ड, सिल्व्हर आणि व्हाइट अशा तीन बॉडी कलर पर्यायांमध्ये असून ३ वर्षे/एक लाख किमीच्या वॉरंटीसह आणि २०,००० किमीच्या दीर्घ सेवा अंतरालसह येत आहे.  महिंद्रा पर्यायी ३-वर्षे / ९०००० किमी मोफत प्रतिबंधात्मक देखभाल सेवा देखील देत आहे.

ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप भारतातील पिकअप विभागामध्ये महिंद्राचे वर्चस्व आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. LCV 2T ते 3.5T श्रेणीतील आर्थिक वर्ष २३ मधील पहिल्या तिमाहीत ६०% बाजारपेठीय हिस्यासह महिंद्रा आपले नेतृत्व स्थान मजबूत करण्यासाठी श्रेणीतील अनेक वर्ग-अग्रणी उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्यात आघाडीवर आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...