मुंबई, 05 ऑक्टोबर, २०२१: महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या भारताच्या तिस-या सर्वात मोठ्या थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स (३पीएल) सोल्यूशन प्रदाता कंपनीने रोजगार व क्षमता वाढवत सणासुदीच्या काळामधील मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या कार्यसंचालनांमध्ये वाढ केली आहे. कंपनीची त्यांच्या थर्ड-पार्टी कर्मचारीवर्गामध्ये हंगामी आधारावर १४००० हून कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आहे.
आगामी सणासुदीच्या काळात कंपनी भारतातील ८ प्रमुख शहरांमध्ये जवळपास १.१ दशलक्ष चौरस फूट जागेवर पॉप-अप सुविधांसारख्या उपाययोजना राबवणार आहे. या उपाययोजना फुलफिलमेंट सेंटर, सॉर्ट सेंटर आणि रिटर्न्स प्रोसेसिंग सेंटर्समधील त्यांच्या ई-कॉमर्स ग्राहकांसाठी आहेत, ज्यामधून ग्राहकांना कार्यक्षम व वेळेवर डिलिव्हरी मिळण्याची खात्री मिळेल.
तसेच कंपनीने देशभरात विविध लास्ट-माइल डिलिव्हरी सेंटर्स सुरू करत त्यांची शेवटच्या अंतरापर्यंतची पोहोच देखील वाढवली आहे. हे सेंटर्स लहान, तसेच मोठ्या पॅकेजेससाठी प्रतिदिन १००,००० हून अधिक शिपमेंट्स डिलिव्हर करण्यासाठी सुसज्ज आहेत.
इलेक्ट्रिक डिलिव्हरी ब्रॅण्ड ईडीईएलअंतर्गत एमएलएल ओईएमकडून विविध प्रकारचे इलेक्ट्रिक वेईकल्स देखील खरेदी करणार आहे आणि भारतभरात ईव्ही उपस्थिती दर्शवणार आहे. ईडेलचा पोर्टफोलिओ ४०० वेईकल्सपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि भारतातील १२ प्रमुख शहरांमध्ये कार्यरत राहणार आहे, ज्यामध्ये बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद व कोलकाता या शहरांचा समावेश आहे. तसेच कंपनीचा डिलिव्हरी व नोंदणीवर अधिक भर देत हा पोर्टफोलिओ ५०० ईव्हींपर्यंत वाढवण्याचा देखील मनसुबा आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ”यंदा सणासुदीच्या काळामध्ये सामना करावे लागलेले आव्हान म्हणजे अल्पावधीतच विभागांमध्ये मागणी (तिप्पट ते पाचपट) वाढली. सणासुदीच्या काळानंतर मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जटिलतांमध्ये अधिक भर होते. या आव्हानाचे व्यवस्थापन करण्यासाठी उत्तम नियोजन आवश्यक आहे. एमएलएलमध्ये आम्ही मनुष्यबळ, जागा, उपकरण, वाहने इत्यादींसारख्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुरवठा साखळीमध्ये तात्पुरती क्षमता वाढवली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी रिटर्न्स प्रोसेसिंग, पॉप-अप सॉर्ट सेंटर्स व एकीकृत वितरण सेवा यांसारख्या नवीन उपाययोजना सादर करत आमचा दृष्टीकोन अधिक विस्तृत देखील केला आहे. मालमत्ता-केंद्रित कंपनी असल्यामुळे आम्ही परिवहन व डिलिव्हरीसाठी व्यवसाय भागीदारांच्या आमच्या नेटवर्कचा वापर करतो. आम्ही या आव्हानांना हाताळण्यासाठी आमचे ग्राहक व व्यवसाय भागीदारांसोबत सहयोगाने काम करतो.”

