महिंद्रा’ने सादर केली नवीन ‘बोलेरो निओ’; रु. 8.48 लाख या प्रारंभिक किंमतीत

Date:

मुंबई13 जुलै2021 : भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आणि संख्येनुसार जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने ‘बोलेरो निओ’ ही गाडी आज सादर केली व आपल्या ‘बोलेरो’ या अत्यंत यशस्वी अशा एसयूव्ही श्रेणीमध्ये नव्याने भर घातली. भारतात सर्वत्र महिंद्राच्या वितरकांकडे आजपासून उपलब्ध होणाऱ्या नवीन ‘बोलेरो निओ’ची ‘एन4’ या प्रकारातील मॉडेलची किंमत 8.48 लाख रु. (एक्स-शोरूम ऑल इंडिया) इतकी आहे. ‘बोलेरो निओ’ सादर झाल्यानंतर, ‘बोलेरो एसयूव्ही पोर्टफोलिओ’मध्ये आता निष्ठावंत ग्राहकांसाठी विद्यमान ‘बोलेरो’ मॉडेल आणि नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी दणदणीत, अस्सल, कोठेही जाण्याची क्षमता असलेले आणि तरीही आधुनिक व झोकदार असे नवीन ‘बोलेरो निओ’ मॉडेल, हे दोन्ही प्रकार उपलब्ध झाले आहेत.

या संदर्भात ‘एम अॅंड एम’च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाक्रा म्हणाले, “बोलेरो ब्रँडला निष्ठावान ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने लाभला आहे, तसेच या गाडीने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय रस्त्यांवर राज्य केले आहे. बोलेरो निओच्या माध्यमातून आम्ही बोलेरो ब्रॅंडशी ग्राहकांची असलेली आत्मीयता आणि त्यांचा आधुनिक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व आणि आकांक्षा यांना एकत्र आणले आहे. नवीन ‘बोलेरो निओ’चे डिझाईन, तिची कामगिरी व तिच्यामधील प्रगत अभियांत्रिकी ही वैशिष्ट्ये बोलेरोच्या मूळ गुणसूत्रांशी व्यवस्थित जुळतात. त्यातून हे मॉडेल धाडसी व निर्भय अशा तरूण भारतीयांसाठी उपयुक्त ठरते. ‘बोलेरो एसयूव्ही ब्रँड पोर्टफोलिओ’मध्ये ‘बोलेरो निओ’ समाविष्ट झाल्यामुळे आम्हाला देशातील सर्वाधिक खपाच्या 10 अव्वल एसयूव्हींमध्ये बोलेरो ब्रॅंड टिकवून ठेवण्यास मदत होईल.”

बोलेरो निओ ही गाडी अस्सल व तरीही आधुनिक बोलेरो कशी बनते? 
ü	‘क्लासिक बोलेरो’ची आकृती आणि त्यामध्ये आधुनिक, अतुलनीय, दखल घेण्याजोगे डिझाइन;  प्रीमियम इटालियन डिझाइन इंटिरियर आणि आरामदायीपणा, सोई-सुविधा व कनेक्ट राहण्यासाठीची वैशिष्ट्ये
ü	73.5 किलोवॅट (100 बीएचपी) शक्ती आणि 260 एनएम टॉर्क देणाऱ्या एमहॉक 100 इंजिनची दमदार कामगिरी.
ü	स्कॉर्पिओ व थार या मॉडेल्ससाठी वापरण्यात येणाऱ्या ‘थर्ड जनरेशन चॅसिस’वरील बांधणीमुळे दणकटपणा व कोठेही जाण्याची क्षमता.
ü	मल्टी टेरेन टेक्नॉलॉजी (एमटीटी)
ü	उल्लेखनीय सुरक्षा यंत्रणा आणि किंमतीतही कमी
ü	देखभालीचा कमी खर्च
आधुनिक डिझाइन, शक्तिशाली तंत्रज्ञान आणि मोहक वैशिष्ट्यांनी युक्त अशी ‘बोलेरो निओ’ ही नव्या पिढीच्या तरुण ग्राहकांसाठी बनविली गेली आहे. यामध्ये स्टाईलिश नवीन डिझाइन, इटालियन ऑटोमोटिव्ह डिझायनर पिनिनफरीना यांनी तयार केलेले प्रीमियम इंटिरियर, आरामदायी केबिन आणि सुरक्षा तंत्रज्ञान (उदा. स्टॅंडर्ड ड्युअल एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिव्युशन (ईबीडी) व कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (सीबीसी) असलेली अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) व आयसोफिक्स चाईल्ड सीट) यांचा समावेश आहे. ‘था’र व ‘स्कॉर्पिओ’मध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘थर्ड जनरेशन चॅसिस’वर बोलेरो निओ बांधण्यात आली आहे. महिंद्रा एमहॉक इंजिनवर ही गाडी चालते.

‘एम अॅंड एम’च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे जागतिक उत्पादन विकास विभागाचे प्रमुख वेलुसामी आर म्हणाले, “स्कॉर्पिओ व थार या मॉडेल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘थर्ड जनरेशन चॅसिसव’र बोलेरो निओ बांधण्यात आली असली, तरी तिच्यामध्ये काही शक्तीशाली गुणधर्म आहेत. त्यामुळे ही गाडी वेगळीच ठरते. तिची दणकट बॉडी-ऑन-फ्रेम बांधणी, सिद्ध स्वरुपाचे ‘महिंद्रा एमहॉक डिझेल इंजिन’ आणि ‘मल्टी टेरेन टेक्नॉलॉजी’ यामुळे खडबडीत भागांवरही सहजपणे जाण्याची तिच्यात क्षमता आहे व ती चालकाला तसा आत्मविश्वास देते. सर्व प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश असणारी बोलेरो निओ उत्पादनाची गुणवत्ता, कार्यप्रदर्शन, एसयूव्हीचे मूळ गुणधर्म आणि मूल्य यांबद्दलची आमची कटिबद्धता व्यक्त करते.”

बोलेरो प्लॅटफॉर्मवरील गाड्या गेल्या दोन दशकांच्या काळात ज्या विशिष्ट गुणधर्मांमुळे लोकप्रिय झाल्या, ते सर्व गुणधर्म नवीन ‘बोलेरो निओ’मध्ये नवीन वैशिष्ट्यांबरोबर कायम आहेत. अत्यंत प्रभावशाली ठेवण, ‘बोलेरो’ची खास ‘बॉडी क्लॅडिंग’ या बाबी गाडीच्या डिझाईनमधून दिसून येतात; एवढेच नव्हे, तर 100 एचपी क्षमतेचे एमहॉक इंजिन, दणकट बांधणी, ‘बॉडी-ऑन-फ्रेम’ बांधणीमुळे कोठेही जाण्याची गाडीची रचना, रिअर व्हील ड्राईव्ह आणि कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरून जाण्याची क्षमता यांतूनही हे सिद्ध होते.

नवीन बोलेरो निओ एका प्रशस्त 7-सीटर स्वरुपात, तसेच तीन प्रकारांमध्ये (एन4-बेस, एन8-मिड, एन10-टॉप) आणि सात रंगांमध्ये (रॉकी बीज, मॅजेस्टिक सिल्व्हर, हायवे रेड, पर्ल व्हाइट, डायमंड व्हाइट, नापोली ब्लॅक आणि रॉयल गोल्ड (लवकरच येत आहे) उपलब्ध आहे. महिंद्राच्या वितरकांकडे ती 13 जुलै 2021 पासून मिळेल.

मल्टी टेरेन टेक्नॉलॉजी (मॅन्युअल लॉक डिफरेंशिअल) असलेले ‘एन10-टॉप’ हे पर्यायी मॉडेल आगामी काळात सादर करण्यात येणार आहे.

नवीन बोलेरो निओची वैशिष्ट्ये

आलिशान अंतर्गत सजावट :

·         प्रीमियम इटालियन इंटिरिअर

·         सिल्व्हर अ‍ॅक्सेंटसह सेंटर कन्सोल

·         प्रीमियम फॅब्रिक सीट्स

·         आरामदायी 7-सीटर

·         टिल्टेबल स्टीयरिंग

·         उंची बदलता येणारे ड्रायव्हर सीट

·         पुढल्या व मधल्या ओळींमध्ये आर्मरेस्ट

·         आकर्षक ट्विन पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

·         इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम

·         फ्रंट व रिअर पॉवर विंडोज

·         डिफॉगरसह रिअर वॉश व वाईप

·         रिमोट लॉक व कीलेस एन्ट्री

·         मस्क्युलर साईड व रिअर फूटस्टेप्स

·         प्रशस्त व वाढविता येण्याजोगी बूट स्पेस

बाह्यरुपामध्ये समकालीन चिन्हे :

·         अस्सल एसयूव्ही डिझाइन आणि प्रभावशाली ठेवण

·         डीआरएलसह स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प

·         स्टाईलिश अलॉय व्हील्स

·         स्पोर्टी स्पॉईलर

·         खास बोलेरो बॉडी क्लॅडिंग

·         कमांडिंग हूड

·         शक्तिशाली फॉग लॅम्प्स

प्रगत तंत्रज्ञान : संपर्कात राहामाहिती घ्यामनोरंजन मिळवा :

·         प्रगत 17.8 सेमी (7 ”) टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

·         अत्याधुनिक क्रूझ कंट्रोल

·         चालकाला माहिती देणारी प्रणाली

·         हाय-टेक व्हॉईस मेसेजिंग सिस्टम

·         ब्लू सेन्स मोबाइल अॅप

·         इको मोड

·         ईएसएससह (इलेक्ट्रॉनिक स्टार्ट-स्टॉप) मायक्रो हायब्रिड तंत्रज्ञान

·         इंटेलीपार्क रिव्हर्स असिस्ट

सुरक्षितता : मार्गावरील प्रत्येक मैलावर तुम्हाला धीर देणारी यंत्रणा :

·         उच्च शक्तीचे स्टील बॉडी शेल

·         चालक व सह-चालकासाठी दुहेरी एअरबॅग

·         इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्यूशनसह (ईडीएस) एबीएस

·         स्वयंचलित डोअर लॉक

·         अतिवेगाचा इशारा देणारी यंत्रणा

·         डिपेंडेबल कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल

·         आयसोफिक्स चाईल्ड सीट

·         स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स

·         फॉलो मी हेडलॅम्प्स

·         डिजिटल इम्मोबिलायझर

·         सीट बेल्ट रिमाईंडर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...