महिंद्रा तर्फे पिकअप्स आणि छोट्या व्यावसायिक वाहनांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भागीदारीत विशेष आर्थिक योजना सादर

Date:

दरमहा ६६६६ रुपये इतक्या कमी किंमतीतील इएमआय पासून सुरुवात

·         ११.५% इतक्या कमी व्याजदरांपासून सुरुवात

·         जास्त किंमतीची कर्ज रक्कम- ८५% ऑन रोड फंडिंग (जास्तीत जास्त १० लाख रुपये.)

·         जास्तीचा कर्ज कालावधी: ६ वर्षांपर्यंत (१ महिन्याच्या स्थगितीसह)

·         थर्ड पार्टी हमीदार नाही. पहिल्या वेळच्या वापरकर्त्यांना आयटीआरची गरज नाही.

मुंबई, २३ ऑगस्ट २०२१: भारतातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनी असणाऱ्या आणि तीन चाकी वाहनांपासून ५५ टन एचसीव्ही ट्रक्स पर्यंत विविध प्रकारची उत्पादने आणि सुविधा पुरविणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. महिंद्रा अँड महिंद्राची छोटी व्यावसायिक वाहने आणि पीकअप्सच्या खरेदीवर या सामंजस्य करारातून विशेष आर्थिक मदत मिळणार आहे. त्यात सर्वोत्तम व्याज दर आणि कर्ज कालावधी आहे. एसबीआयच्या कॉन्टॅक्टलेस लेंडिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाने पुढे जाऊन एकवाक्यता, पारदर्शकता यांची खात्री दिली असून कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीही कमी केला आहे. यामुळे ग्राहकांच्या कॅशफ्लो मध्येही लवचिकता येईल आणि सप्रो प्रॉफीट ट्रक अँड जितो आणि पिकअप उत्पादन मालिकेत कॉन्टॅक्टलेस मालकी अनुभव घेता येईल त्यायोगे महिंद्रा वाहनांची मालकी सुरक्षित आणि परवडणारी ठरेल.

या घोषणेसंदर्भात बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजन एससीव्हीचे व्यवसाय प्रमुख अमित सगर म्हणाले, “सर्वोत्तम ग्राहक अनुभव आणि सेवा पुरविण्याच्या आमच्या कामात आम्ही सदैव आमच्या ग्राहकांना आनंद देणाऱ्या योजना सादर करण्याच्या प्रयत्नांत असतो. आमची आर्थिक योजना केवळ वैशिष्ट्यपूर्ण आहे असे नाही तर अत्यंत समर्पकही आहे. जोडीला एसबीआयची देशभर असलेली पोहोच आणि विश्वास आहे. ही योजना आमच्या एससीव्ही आणि पिकअप ग्राहकांना आत्मविश्वास देत प्रेरणा देईल आणि त्यांना प्रगती करण्यासाठी मदत करेल.”

एसबीआय बरोबरच्या सहकार्याने महिंद्रा अँड महिंद्राच्या छोट्या व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस आणि अडथळामुक्त पद्धतीने केवळ ५९ मिनिटात कर्ज मंजुरी प्रक्रिया पार पडेल. यामुळे ग्राहकांना (३.४५ लाख रुपये कर्जापर्यंतच्या रकमेसाठी) ६६६६ रुपये इतक्या कमी किंमतीतल्या इएमआयसह सर्वोत्तम उत्पादन खरेदी करता येईल आणि त्यासाठी व्याजदरही कमी म्हणजे ११.५% असेल. यामध्ये ग्राहकांना कर्जाचा कालावधीही ६ वर्षांपर्यंत वाढविण्याची लवचिकता आहे. त्यामध्ये एक महिन्याचा कर्ज हप्ता भरायला स्थगिती कालावधीही आहे. ग्राहक रोड फंडिंग वर ८५% पर्यंत जास्तीच्या कर्ज रकमेचीही ग्राहक निवड करू शकतात. त्यासाठी थर्ड पार्टी हमीदार असण्याची गरज नाही. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांसह छोटे रस्ते वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिक वाहनांसाठीचे प्रथम खरेदीदार यांनाही एसबीआय बरोबरच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन वित्तीय योजनेचा फायदा घेता येऊ शकतो.

संपूर्ण भारतात पोहोच आणि २२,००० हून अधिक शाखा इतका मोठा पसारा असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे भारतभर खूप मोठे जाळे आहे आणि या भागीदारीतून रोजगाराला चालना देत आणि आपल्या ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण आर्थिक मदत पुरवत त्यांना आपली पोहोच विशेषकरून ग्रामीण भागात आणखी बळकट करण्याची आशा आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने अलिकडेच यशस्वी सप्रो प्लॅटफॉर्मवर विकसीत केलेली सप्रो प्रॉफीट ट्रक मालिका सादर केली. ती वाजवी किंमतीतील, अधिक शक्तिशाली, अधिक पेलोड क्षमता असलेली आणि अधिक मायलेज देणारी आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होईल. सप्रो प्रॉफीट ट्रक मालिका डिझेल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधन पर्यांयांमध्ये उपलब्ध आहे. जितो ब्रँड २०१५ मध्ये सादर झाला. त्याला मोठे यश मिळाले आणि २ लाखांहून अधिक ग्राहकांनी त्याची निवड केली. दोन टन ओझे क्षमता असणारा आणि डिझेल, सीएनजी आणि गॅसोलीन अशा विविध इंधनांवर चालणारा तसेच दोन वेगवेगळे डेक आकार पुरविणारा हा ब्रँड आहे. महिंद्रा बोलेरो पिकअप मालिका गेल्या दोन दशकांपासून बाजारपेठेत अग्रणी असून १६ लाखांहून अधिक ग्राहकांनी याची निवड केली आहे. सिंगल केबिन, डबल केबिन, एसी, ४ डब्ल्यूडी आणि सीएनजी पर्याय यांसह ग्राहकांच्या गरजांनुसार विविध पेलोड आणि कार्गो आकार असलेली महिंद्रा बोलेरो पिकअप मालिकेतील विविध वाहने आहेत. महिंद्रा ब्रँड बरोबर दीर्घकालीन नातेसंबंध उभारताना ग्राहकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकणे आणि त्यांना अधिक मिळकतीसाठी आणि आयुष्यात अधिक प्रगती करण्यासाठी सक्षम करणे हे उद्दिष्ट आहे. आपल्या प्राथमिक आणि दुय्यम सेवा जाळे आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ यांच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा विक्री पश्चात सर्वोत्तम पाठबळ सेवा पुरविते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरे बंधू एकत्र येताच भाजपने रणनीती बदलली:शिंदे गटासाठी जागांची संख्या वाढवली, तरीही नाराजी

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि...

आम्ही सत्तेसाठी, मग तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? संजय राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार

अदाणीला मुंबई विकणे मराठी माणसाची केलेली सेवा नाहीमुंबई-ठाकरे बंधूंच्या...

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...