‘महिंद्रा’तर्फे नवीन हेवी-ड्यूटी रोटाव्हेटर – महिंद्रा महाव्हेटर – सादर

Date:

·         हलक्या मातीसाठीच्या खास ‘महिंद्रा गायरोव्हेटर’च्या यशस्वी सादरीकरणानंतर, ‘हेवी-ड्यूटी रोटाव्हेटर’ विभागात ‘महिंद्रा’चा प्रवेश.

·         उत्तम कामगिरी, विश्वासार्हता व टिकाऊपणासाठी, भारतातील व युरोपमधील ‘महिंद्रा’च्या ‘आर अँड डी’ केंद्रांद्वारे कठोर चाचण्यांसह डिझाइन व विकसीत.

·         ‘महिंद्रा’च्या ट्रॅक्टर वितरकांच्या व्यापक नेटवर्कद्वारे ‘महिंद्रा फायनान्स’कडून वित्तपुरवठा उपलब्ध.

·         ‘महाव्हेटर’चा एक भाग आणि स्वतंत्रपणे सुटा भाग म्हणून ‘महिंद्रा बोरोब्लेड’ही सादर.

मुंबई, 30 ऑगस्ट2021 : सुमारे 19.4 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या आणि ट्रॅक्टरच्या उत्पादनात जगात सर्वात मोठ्या असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीच्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ने ‘महिंद्रा महाव्हेटर’ हा नवीन ‘हेवी-ड्यूटी रोटाव्हेटर’ महाराष्ट्रात सादर केला आहे.

नवीन ‘महिंद्रा महाव्हेटर’चा वापर सर्व प्रकारच्या मातीमध्ये केला जाऊ शकतो. तो खासकरून कठीण मातीसाठी, तसेच ऊस व कापसासारख्या पिकांची कापणी झाल्यावर मातीत उरलेले बुडखे काढून टाकण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेला आहे. या ‘महाव्हेटर’च्या सहाय्याने मातीची कठीण ढेकळे सहज फोडता येतात आणि पिकांच्या निरोगी वाढीसाठी माती बारीक करता येते. ‘महिंद्रा’च्या भारत व युरोपमधील संशोधन व विकास केंद्रांमधून उत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानासह डिझाइन केलेल्या या ‘रोटाव्हेटर’च्या देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या शेतांत व परिस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तो योग्यता व विश्वसनीयता यांच्या कसोटीस उतरला आहे.

एकाच वेळी ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर या दोन्ही गोष्टी खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पैशाची व्यवस्था करण्याकरीता ‘महिंद्रा’ने ‘महिंद्रा फायनान्स’शी हातमिळवणी करून 85 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याच्या सोयीस्कर व आकर्षक कर्जयोजना आणल्या आहेत. ही कर्जाऊ रक्कम ‘रोटाव्हेटर’च्या प्रकारावर अवलंबून असणार आहे.

‘महिंद्रा’ने ‘रोटाव्हेटर’चे अत्यंत टिकाऊ असे ब्लेडही ‘महिंद्रा बोरोब्लेड्स’ या नावाने आणले आहेत. कारखान्यात बनविण्यात येणाऱ्या ‘रोटाव्हेटर’वरही हे ब्लेड्स बसविले जातात आणि सुटे भाग म्हणूनही ते वितरक व दुकानदार यांच्याकडे विकत मिळतात.

‘महिंद्रा महाव्हेटर’च्या सादरीकरणाबाबत बोलताना, ‘एम अँड एम लिमिटेड’चे ‘फार्म मशिनरी’ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष कैरस वखारिया म्हणाले, “महिंद्रा’ने 10 वर्षांपूर्वी ‘महिंद्रा गायरोव्हेटर’ सादर केले आणि आज आम्ही या श्रेणीतील एक दिग्गज उत्पादक आहोत. यामध्ये तीन हलक्या मातीचे रोटाव्हेटर्स आहेत आणि त्यातील एक ‘महिंद्रा गायरोव्हेटर’ आहे. ‘महिंद्रा महाव्हेटर’ सादर करून आम्ही ‘महिंद्रा’मध्ये हलक्या मातीच्या ‘रोटाव्हेटर्स’च्या बरोबरीने ‘हेवी-ड्यूटी रोटाव्हेटर्स’मध्येही पदार्पण केले आहे.

महाव्हेटर आणि गायरोव्हेटर यांव्यतिरिक्त, ‘महिंद्रा’कडे बागायती, कोरडवाहू जमिनी, वाइनयार्ड आणि फलोद्यानांसाठीही ‘रोटाव्हेटर्स’ची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. हे रोटाव्हेटर्स 15 एचपी ते 70 एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टरच्या श्रेणीशी जोडले जाऊ शकतात.

महाराष्ट्रातील आमच्या 84 महिंद्रा ट्रॅक्टर वितरकांच्या नेटवर्कद्वारे नवीन ‘महिंद्रा महाव्हेटर’ची किरकोळ विक्री केली जाईल. या वितरकांनी अनेक दशकांपासून विक्रीपश्चात सेवा विश्वसनीय पद्धतीने दिली असून ते शेतकऱ्यांच्या विश्वासास व आदरास पात्र आहेत.

‘महिंद्रा’चे रोटाव्हेटर्स भारतात विविध भागांमध्ये असलेल्या 3 कारखान्यांमध्ये ‘महिंद्रा’च्या कडक गुणवत्तेच्या मानकांनुसार तयार केले जात आहेत. गुणवत्तेबाबतचा आमचा हा आग्रह पुरवठादार आणि लॉजिस्टिक्स यांनाही लागू आहे. त्यातून शेतकऱ्यांना निर्दोष उत्पादन मिळेल, याची खातरजमा होते.

‘महिंद्रा’कडून ‘रोटाव्हेटर’वर एक किंवा दोन वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. वॉरंटीचा हा कालावधी ‘रोटाव्हेटर’च्या प्रकारावर अवलंबून राहील. इतर उत्पादक केवळ 6 महिन्यांचीच वॉरंटी देत असताना, त्या तुलनेत ‘महिंद्रा’कडून जास्त वॉरंटी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक शांती मिळते.

‘महिंद्रा’विषयी :

1945 मध्ये स्थापन झालेला महिंद्रा उद्योगसमूह 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 260,000 कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्वात मोठा आणि सर्वात आदरणीय असा बहुराष्ट्रीय महासंघ आहे. भारतात शेती उपकरणे, उपयुक्तता वाहने, माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवांमध्ये तो अग्रगण्य आहे. ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. अपारंपरिक ऊर्जा, कृषी, लॉजिस्टिक्स, आदरातिथ्य आणि स्थावर मालमत्ता या क्षेत्रांमध्ये तिचे मजबूत अस्तित्व आहे.

जागतिक स्तरावर ‘ईएसजी’वर, ग्रामीण भागात समृद्धी आणण्यावर आणि शहरी भागांत जीवनमान वाढविण्यावर महिंद्रा समुहाचे लक्ष केंद्रित आहे. यातून समाज व भागधारक यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणून त्यांना उन्नतीसाठी सक्षम करणे हे या समुहाचे ध्येय आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...