मुंबई,8 जून २०२२: महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने लोकप्रिय अल्फा ब्रँडवर आधारित नवीन अल्फा सीएनजी पॅसेंजर आणि कार्गो प्रकार सादर केली. नवीन प्रकाराची आकर्षक किंमत अल्फा पॅसेंजर डीएक्स BS6 सीएनजी साठी ₹ 2,57,570.00 आणि अल्फा लोड प्लस साठी ₹ 2,58,580.00 आहे (एक्स-शोरूम, लखनऊ). याव्यतिरिक्त, अल्फा कार्गो आणि पॅसेंजर मालक डिझेल कार्गो थ्री-व्हीलरच्या तुलनेत ५ वर्षांमध्ये ₹ 4,00,000.00 अतिरिक्त इंधन खर्चात बचत करू शकतात. ही वाहने उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, बिहार, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेशमधील महिंद्रा डीलरशिपवर उपलब्ध असतील.
महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा बोलल्या “नवीन अल्फा सीएनजी कार्गो आणि पॅसेंजर सादर केल्याने आमच्या ग्राहकांना त्यांच्या विविध गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक, डिझेल आणि सीएनजीसह अनेक पर्याय सादर करून आम्हाला पूर्ण श्रेणीचे उत्पादक बनवले आहे. भारतातील काही सीएनजी स्टेशन्सच्या वाढत्या घनतेसह अल्फा कार्गो आणि पॅसेंजर ही मोठी बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय होइल”
महिंद्रा अल्फा सीएनजीची वैशिष्ट्ये
1. ५ वर्षात ₹ 4,00,000.00 अतुलनीय बचत
डिझेल थ्री-व्हीलरच्या तुलनेत (लखनऊ मध्ये मार्च २०२२ पर्यंत CNG ₹ 68.1/kg, आणि
डिझेल = ₹ 90.92/litre) 5 वर्षात ₹ 4,00,000.00 इंधन खर्चाची बचत
2. विभागातील सर्वोत्तम मायलेज
· अल्फा डीएक्स पॅसेंजर 40.2 km/kg तर लोड प्लस 38.6 km/kg मायलेज देते (ARAI चाचण्यांनुसार). हे अतिशय उत्तम ऑपरेटिंग रेंजचे प्रदान करते.
3. विभागातील सर्वोत्तम इंजिन क्षमता आणि टॉर्क
· 395 cm³, वॉटर-कूल्ड इंजिन त्याच्या वर्गातील सर्वात मोठे आहे आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेची खात्री देते
· इंजिन 23.5 Nm चे विभागातील सर्वोत्तम टॉर्क सादर करते ज्यामध्ये रहदारीच्या पुढे राहण्यास मदत होण्यासाठी कमी वेगात जास्तीत जास्त 20 Nm टॉर्क उपलब्ध
4. अतुलनीय विश्वसनीयता, टिकाऊपणा
· खडबडीत प्लॅटफॉर्मवर आधारित, 0.90 mm सर्वोत्कृष्ट शीट मेटल जाडीसह, पॅसेंजर सीएनजी तसेच कार्गो प्रकार उच्च टिकाऊपणा देतात.
· संपुर्ण भारतामध्ये 800 हून अधिक डीलर टच पॉइंट्ससह महिंद्रा सीएनजीची देखभाल सुलभ पोहोच मध्ये