Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिंद्रा बाहा एसएइइंडिया 2017ची दहावी स्पर्धा फेब्रुवारीत . अंतिम फेरीसाठी 185 कॉलेजातल्या 414 विद्यार्थ्यांची निवड

Date:

पुणे : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने एसएइइंडिया या वाहन अभियंत्यांच्या
व्यावसायिक विभागाबरोबरच्या भागीदारीत, आज दहाव्या बाहा या बहुप्रतिक्षित मालिका जाहीर केली. या मालिकेची अंतिम फेरी इंदोरजवळच्या पितमपूर येथील एनटीआरआयपी फॅसिलिटीमध्ये 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2017 या कालावधीत होईल. बाहा एसएइइंडिया 2017साठी 150 कव्हेन्शनल बाहासाठी निवडलेल्या टीमपैकी आणि व्हर्च्युअल राउंडच्या इबाहासाठीच्या 34 टीमपैकी 414 प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या आहेत.

बाहा एसएइइंडियाने इबाहा मालिकाही सुरू केली आहे, याचा भारतातील इलेक्ट्रिक वाहतुकीमुळे लाभ मिळू शकतो. एमबाहा वाहनं 10 एचपी बीअँडएस गॅसऑलिन इंजिनवर धावतील, 150 टीमसाठी ही परिस्थती सारखीच असेल, याशिवाय इबाहा वाहनं विजेवर धावतील, यासाठी विजेवरील मोटर आणि पुन्हा चार्ज करता येणारी लिथियम-आयोन बॅटरी पॅक आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात तांत्रिक तपासणी, रचना, किंमत आणि विक्री सादरीकरण यांसारखे सांख्यिक गुणांकन, चालनेसारखे बदलते उपक्रम, टेकड्यांवरील चढाई, शंकेची खात्री आणि मॅनइव्हर्बलिटी यांचाही समावेश आहे. एमबाजाची सहनशक्ती चाचणी फेरी 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे, तर इबाहाची 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात य़ेईल.

बाहा एसएइइंडियाचं लक्षात ठेवण्याजोगं अनोखं वैशिष्ट्यं म्हणजे प्रत्येक वर्षीच्या नव्या थीमचा स्वीकार. बाहा 2017ची थीम आहे `डिकेट ऑफ ड्रीम डेअर अँड ड्राइव्ह;, याद्वारे बाहा एसएइइंडियाची 10 शानदार वर्षं साजरी केली जातील. पर्यायी गोष्टी वापरण्याची विद्यार्थ्यांची स्वप्नं, मर्यादांचा विचार न करता आपली स्वप्न सत्यात उतरवण्याचे त्यांचे धाडस आणि अधिक उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक बदल व्हावेत यासाठीची चालना, या प्रवासाची ही दहा वर्षं आहेत.

बाहा 2017च्या अंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातून 53 प्रवेशिका आहेत, त्यापैकी 24 कॉलेजं पुण्यातील आहेत. बाहा मालिकेच्या शेवटच्या काही आवृत्त्यांमध्ये जास्तीत जास्त प्रवेशिका पुणे शहरातूनच आल्या आहेत. तसंच गेल्या काही वर्षांतल्या अंतिम फेऱ्यांमधील विजेतेपदही पुण्यानेच जिंकली आहेत. बाहा 2016मध्ये हे हवंहवंसं वाटणारं विजेतेपद पुण्याच्या अलार्ड कॉलेज ऑफ
इंजिनिअरिंग या कॉलेजाने पटकावलं. तसंच पुण्याच्यात श्रीमती काशीबाई नवाले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजानं `बेस्ट इबाहा टीम ; हे शीर्षक मिळवलं.
बाहाच्या अंतिम फेरीसाठी देशभरातील इंजिनिअरिंग कॉलेजांनी प्रवेशिका भरल्या आहेत,
बंगळुरूच्या क्राइस्ट विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल फेरीत ही कॉलेजं सादरही झाली होती, यावेळी त्यांनी बाहा बगी वाहनसाठी रचना सादर केल्या, या रचना त्यांना अंतिम फेरीसाठी होत्या.

या फेरीतून लेखी परीक्षा, कॅड रचना, सीएइचे विश्लेषण आणि रोल केज रचना, शंकातपासणी, स्टीअरिंग आणि ब्रेक अशा कठोर चाचण्यांमधून पात्र टीम निवडण्यात आल्या. व्हर्च्युअल बाहासाठी आलेल्या प्रवेशिकांसमोर मुख्य फेरीसारखीच प्रतिकृती चाचणी घेण्यात आली. अंतिम फेरीत पोचलेल्या टीमला त्यांचं कौशल्य, त्यांना समजलेली माहिती आणि त्यांची वाहनउद्योगासाठीची पॅशन या साऱ्या गोष्टी स्वतःची बगी रेसिंग कार तयार करताना दाखवायच्या आहेत.

यानिमित्ताने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ, पवन गोएंका
म्हणाले की, “ बाहा एसएइइंडिया 2017साठी शीर्षक प्रायोजक म्हणून संलग्नित होता येणं ही आनंदाची गोष्ट आहे. महिंद्राच्या विस्ताराचे तत्त्वज्ञान आम्ही बाहासह पुढच्या टप्प्यावर नेत आहोत. अनेक वर्षांपासून आम्ही कॉलेजांमधला आमचा सहभाग वाढवत आहोत आणि राष्ट्रीय पातळीवर बाहा एसएइइंडियाची लोकप्रियता वाढतच जात आहे. ज्यांचा आपल्या स्वप्नांवर
विश्वास आहे, तेच भविष्य घडवू शकतात यावर महिंद्राचा विश्वास आहे. स्वप्नांची दशकपूर्ती साजरी करताना, बाहा एसएइइंडिया तरूण अभियंत्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देत आहे आणि याद्वारे त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, हे पाहून आम्हाला नक्कीच आनंद होत आहे.

बाहा एसएइइंडिया 2017चे संयोजक आणि एड्युरन्स टेक्नोलॉजीजचे प्रमुख
तंत्रज्ञान अधिकारी श्री. रवी खारूल म्हणाले की, “महिंद्रा बाहा एसएइइंडिया हा देशात गेल्या दहा वर्षांपासून चालणारा, खरोखरच एक लक्षणीय महत्त्वाचा वाहन उद्योगातला उपक्रम आहे. या स्पर्धेची दशकपूर्ती होत असून, या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना अनोखं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे, या स्पर्धेत सिद्धांत प्रात्यक्षिकता हातात हात घालून जातात. प्रत्येक वर्षी, प्रत्येक आवृत्तीत आम्ही नेहमीच भरघोस ऊर्जा बघत आलो आहोत.
413 टीम व्हर्च्युअल टीमची नोंदणी झाली आणि त्यापैकी 185 सर्वोत्तम होत्या, तर एमबाहासाठी 150 आणि इबाहासाठी 34 उमेदवार तर एक आंतरराष्ट्रीय टीम होती. देशात शाश्वत वाहतूकव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात ध्येय समोर ठेवून आम्ही बाहाचे स्वरूप आखत आहोत, विद्युतीकरण बाहालाही भऱघोस प्रतिसाद लाभला आहे, गेल्या वर्षीपेक्षा
यात 50टक्के जास्त सहभागी संख्या आहे. बाहा टीमना बाजा एसएइइंडिया प्रायोजक समितीतर्फे 2 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

एआरएआयचे ज्येष्ठ उप संचालक आणि बाहा एसएइइंडिया पश्चिमी विभागाचे
अध्यक्ष, तसंच बाजा एसएइइंडियाचे सल्लागार आणि प्रवक्ते डॉ. के सी वोरा पुढे
म्हणाले की, “बाहा हा एसएइइंडियाचा चौकटीबाहेरचा आणि पश्चिम भारतातला विद्यार्थ्यांसाठीचा सर्वात लोकप्रिय उपक्रम आहे. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रम ठरला असून, तो स्वतः एक ब्रँड म्हणूनही प्रस्थापित झाला आहे. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना तब्बल 33 लाख
रुपयांच्या मूल्यांचे पुरस्कारही देण्यात येतात. पुढील वर्षीपासून आम्ही पुढीलप्रमाणे बाहा उपक्रम राबवण्याचा विचार करतो आहोत : यापैकी एक पितमपूर येथे होईल तर दुसरा उत्तर भारतात. महिंद्रा आणि बीपीसीएल या प्रायोजकांनी दहा वर्षांपासून आम्हाला जी साथ दिली त्यासाठी मीत्यांचे आभार मानतो

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...