– मुंबई, पुणे दिल्ली, नोयडा, गुरुग्राम, बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई या आठ शहरांमध्ये उपलब्ध
– महिंद्रा गाडी क्विकलीझमार्फत विकत घेण्याचा सहजसोपा, लवचिक पर्याय ग्राहकांसाठी खुला होणार
– महिंद्रा ऑटो पोर्टल तसेच या आठ शहरांमधील महिंद्रा ऑटोमोटिव्हच्या विशाल डीलरशिप नेटवर्कमार्फत ग्राहक क्विकलीझ लीजींगचा लाभ घेऊ शकतात
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२२: महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा ऑटोमोटिव्हने क्विकलीझ या महिंद्रा फायनान्सच्या आधुनिक वाहन लीजींग आणि सब्स्क्रिप्शन प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली असल्याची आज घोषणा केली आहे. त्यामुळे आता क्विकलीझ महिंद्रा ऑटोच्या पोर्टलवर आणि महिंद्रा ऑटोच्या संपूर्ण डीलरशिप नेटवर्कमध्ये लाईव्ह उपलब्ध असेल. या भागीदारीमुळे ग्राहकांना त्यांनी निवडलेली महिंद्रा गाडी पारदर्शक व सहजसोप्या पद्धतीने लीज करता येईल.
मुंबई, पुणे, दिल्ली, नोयडा, गुरुग्राम, बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई या भारतातील आठ शहरांमध्ये ग्राहकांना क्विकलीझमुळे अधिक जास्त सुविधा, लवचिकता आणि निवडीला भरपूर वाव उपलब्ध होणार आहे. गाड्यांचे मासिक भाडे दर महिन्याला २१००० रुपयांपासून पुढे असणार असून यामध्ये विमा, देखभाल, रस्त्यावर काही समस्या उद्भवल्यास गाडीला देण्यात येणारी सहायता यांचा समावेश असणार असून कोणतेही अतिरिक्त डाऊन पेमेंट करावे लागणार नाही. ग्राहकांना २४ महिने ते ६० महिने यामधील अवधी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तसेच वर्षभरात १०००० किमी पासून पुढील वार्षिक किलोमीटरचे पर्याय निवडण्याची लवचिकता देखील त्यांना मिळेल.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. वीजय नाक्रा यांनी सांगितले, “ग्राहकांच्या बदलत्या गरजा ध्यानात ठेवून पे पर यूज मॉडेल खास तयार करण्यात आले आहे. आमच्या विक्री चॅनेल्समार्फत ग्राहकांना लीजींगचेही पर्याय उपलब्ध करवून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना सोप्या व सुविधाजनक पद्धतीने लवचिकता व पारदर्शकता यांचे लाभ मिळवता येतील. कालावधी संपल्यानंतर परत करण्याच्या, बाय बॅक करण्याच्या किंवा अधिक नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्याच्या पर्यायासह ते आपल्या आवडीची वाहने निवडू शकतील. क्विकलीझमुळे आम्हाला भारतामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कार लीजींग बाजारपेठेच्या क्षमता डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने पावले उचलण्यात आणि त्या क्षमतांचा उपयोग करवून मदत मिळेल, ज्यामुळे आमच्या ग्राहकसंख्येत अधिक जास्त वाढ होईल.”
महिंद्रा फायनान्सचे कोअर बिझनेसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. रॉल रिबेलो म्हणाले, “आमच्या क्विकलीझच्या वाटचालीमध्ये महिंद्रा ऑटोसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतात लीजींग आणि सब्स्क्रिप्शन मोड्यूलची सध्या नुकतीच सुरुवात होत आहे, अशावेळी महिंद्राच्या ऑटोच्या क्षमता, त्यांच्याकडून मिळू शकतील असे अनेक, वेगवेगळे लाभ, आमचा देशभरातील विस्तार यामुळे ही भागीदारी नक्कीच लाभकारी ठरेल. मला खात्री आहे की, व्यक्ती आणि कॉर्पोरेट्स अशा आमच्या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना या भागीदारीतून चांगले लाभ मिळतील, या भागीदारीमुळे ते सर्वोत्तम महिंद्रा वाहने लीज करू शकतील.”
क्विकलीझचे एसव्हीपी व बिझनेस हेड श्री. तुर्रा मोहम्मद यांनी सांगितले, “वाहनांचे लीजींग व सब्स्क्रिप्शन हे वाहन मिळवण्याचे नवे सर्वसामान्य आणि किफायतशीर मार्ग बनत आहेत. लीजींग आणि सब्स्क्रिप्शन उद्योग पुढील ५ ते १० वर्षात १५-२०% सीएजीआरने वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती भारतातातील एक वेगाने विकसित होणारी बाजारपेठ बनेल. डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत महिंद्राकडून एसयूव्हीची संपूर्ण श्रेणी लीजींगवर प्रस्तुत करताना आम्हाला आनंद होत आहे. या बाजारपेठेत पक्के पाय रोवणे आणि क्विकलीझ ब्रँडचे स्थान अधिकाधिक बळकट करणे आमचे उद्दिष्ट आहे.”
क्विकलीझच्या सब्स्क्रिप्शन प्लॅटफॉर्म्सवर इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ उपलब्ध आहे. या भागीदारीअंतर्गत क्विकलीझ ई-व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या ताफ्याच्या ऑपरेटर्सना महिंद्राची ट्रिओ लोड वाहने प्रस्तुत करेल. क्विकलीझच्या सब्स्क्रिप्शन मॉडेलमध्ये वाहनांची देखभाल, बॅटरी लाईफ आणि पुनःविक्री मूल्य याबाबत काहीही जोखीम किंवा अनिश्चितता राहणार नाही हे सुनिश्चित केलेले असते.

