पुणे- शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या – विरोधात आज -गुडलक चौक-येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. पूजा मनिष आनंद यांनी मोदी सरकारच्या चुप्पीवर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ‘‘जी व्यक्ती १३ महिन्यांपूर्वी वारली, तिच्या नावे लाइसेन्स कसे मिळू शकते ? कोणाच्या प्रभावामुळे हा बार चालू आहे ? कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली का करण्यात आली ? कारण स्पष्ट आहे की स्मृती इराणी यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या खोट्या बोलत आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेविका सुजाता ताई शेट्टी, वैशाली मराठे, अश्विनी गवारे, प्राची दुधाने, स्वाती शिंदे, वैशाली रेड्डी, राजश्री अडसूळ, श्रद्धा राजेंद्र, सुजाता चिंता, पपीता सोनवणे, माया डुरे, नंदा डावरे, सुनीता नेमुर, संगीता पवार, अनिता गोयर, जरीना खान व इतर महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.