मुंबई
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित 17 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक प्राप्त केले. महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातील एकूण 70 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
उपांत्य सामन्यात अटीतटीच्या लढतीत महावितरणच्या महिला संघाला मुंबई पोलीस महिला संघाकडून केवळ एका गुणाने पराभव पत्कारावा लागला.महावितरणच्या महिला संघाचे नेतृत्व शर्वरी शेलार (कोल्हापूर )हिने केले. या संघात शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू राजश्री पवार (मुंबई), संगीता देशमुख (पुणे) यांच्यासह संजोली आचरेकर, अश्िवनी शेवाळे, हर्षला मोरे, प्रियंका पाटिल (सर्व भांडूप), सायली कचरे (पुणे) तसेच मुंबई येथील तेजश्री दरडे व स्मिता साळुंखे यांचा समावेश होता. संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री.संतोष विश्वेकर व प्रशिक्षणाची जबाबदारी श्री.किरण देवाडीगा यांनी पार पाडली. विजेत्या संघाचे कार्यकारी संचालक (मासं) श्री.निलेश गटणे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.संजय ढोके व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललीत गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

