पुणे : खंडित वीजपुरवठ्यासह सर्व प्रकारच्या तक्रारी किंवा इतर माहिती देण्यासाठी, विचारण्यासाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्ग (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) 24(7 उपलब्ध असून 18002003435 आणि 18002333435 या दोन टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही टोल फ्री क्रमांक मोफत असून राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या मोबाईल व दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधता येतो.
यापूर्वी स्थानिक तक्रार निवारण केंद्गामध्ये तक्रारी नोंदविण्यात येत होत्या. या केंद्गात टेलिफोनवरून तक्रार घेतली जात नाही. योग्य माहिती दिली जात नाही. फोन व्यस्त किंवा बंदच असतो. टेलीफोनचा रिसिव्हर उचलून ठेवला जातो अशा अनेक तक्रारी होत्या. मुख्य म्हणजे तक्रार नोंदविल्यानंतर जबाबदारी निश्चित होत नसे. त्यामुळे महावितरणने शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 100 सिटर कॉल सेंटर उपलब्ध करून दिलेले असून वीजसेवेबाबतच्या सर्व तक्रारी व इतर माहितीसाठी आता फक्त कॉल सेंटरच्या 18002003435 आणि 18002333435 क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
कॉल सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी, विचारण्यासाठी 24(7 सेवा उपलब्ध आहे. तक्रार दाखल केल्यानंतर वीजग्राहकांना तक्रार क्रमांकही देण्यात येतो. त्यानंतर दोन ते तीन मिनिटात तक्रारीची माहिती संबंधीत जनमित्र व सहाय्यक अभियंता यांना मोबाईलवरील एसएमएसद्वारे दिली जाते व तक्रारींच्या निवारणाला प्रत्यक्षात सुरवात होते. याशिवाय नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी आदींबाबत आवश्यक कागदपत्रांसह दाखल केलेल्या अर्जाच्या कार्यवाहीवर प्रशासकीय दिरंगाई होत असल्यास त्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी सोय उपलब्ध आहेत.
कॉल सेंटरमधील इटरॅक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे (आयव्हीआरएस) वीजग्राहकांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत संपर्क साधण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी स्वतःचे एक किंवा दोन मोबाईल क्रमांक किंवा एक दूरध्वनी क्रमांक कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केल्यास कोणत्याही वेळी कॉल सेंटरशी संपर्क साधल्यानंतर तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी तक्रारी किंवा इतर माहिती देण्यासाठी कॉल सेंटरशीच संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


