सुमारे १५० वर्षांपूर्वीचे पुरातन शंकराचे मंदिर
पुणे : श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या पुरातन शंकराच्या मंदिरात महारुद्र अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिराशेजारील मांडवात हा सोहळा पार पडला. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांच्या हस्ते महारुद्र अभिषेक करण्यात आला.
यावेळी संस्थानचे भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होते. आराध्ये गुरुजी यांसह ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले.
तुळशीबाग मंदिर परिसरातील शंकराचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती. शंकराच्या पिंडीवर सकाळी ७ ते दुपारी १२.३० यावेळेत सलग साडे पाच तास अभिषेक करण्यात आला. दोन ते तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा तुळशीबागेत महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात होत असल्याने भाविकांनी देखील दर्शनाकरीता हजेरी लावली होती.
तुळशीबाग राममंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र अभिषेक
Date:

