मुंबई – राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा १०,२२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. करोनामुळे चव्हाट्यावर आलेल्या आरोग्य व्यवस्थेतील दोष दूर करण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयांबरोबरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जाणार आहे. महिला दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणाही करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज शून्य व्याजदरात अशी ही घोषणा आकर्षक ठरली. महिलेच्या नावावर घर खरेदी केलयास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत
एक दिवस नक्कीच करोनावर मात करू. आतापर्यंत दिली तशीच साथ द्या. आमच्या साथीने तुम्हीही करोनावर मात द्या. निर्धार आमचाही झाला आहे, राज्याला पुढे नेण्याचा. करोनाने त्रस्त जनतेला कमीत कमी त्रास देण्याचा. करोनासह सर्व संकटे आईभवानीच्या आशीर्वादाने जळतील. राज्य उत्पादन शुल्कात वृद्धी. मद्यावरील मूल्यवर्धित कर ६० टक्क्यावरून ६५ टक्के करण्याचा प्रस्ताव. १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार. घर खरेदी महिलेच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत दिली जाणार. यामुळे १ हजार कोटी तूट.ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प
पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार त्यासाठी १६१३९ कोटींचा निधी मंजूर.नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार. ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार.राज्यातील अहमदनगर, बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गांचे काम वेगाने केले जाणार.राज्यातील बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १४०० कोटी रुपयेपरिवहन विभागाला २५०० कोटी रुपयेएलोरोच्या विमानतळाचा विस्तार करणार.सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम वेगाने करणार.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी. ‘बर्ड फ्लू’ सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार.जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद. मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेट ची मंजुरी.युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार.
राज्यात दारू महागणार… उत्पादन शुल्कात वाढ
राज्य उत्पादन शुल्क दरात वृद्धी करण्यात आली असून, देशी मद्याचे ब्रॅण्डेड व नॉन ब्रॅण्डेड असे दोन प्रकार निश्चित करून त्यापैकी देशी मद्यावरील उत्पादन शल्काचा दर निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति लीटर करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. मद्यावरील मूल्यवर्धित करामध्येही वाढ करण्यात आली असून, ६० टक्क्यावरून ६५ टक्के करण्याचा प्रस्ताव. १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार. मात्र, यामुळे राज्यात दारू महागणार आहे.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, नाशिक आणि सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार. -शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज-तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अजित पवार यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

