Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघाच्यासभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नाहाटा

Date:

संतोष सोमवंशी उपसभापतीपदी; महासंघावर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व, शिवसेना, काँग्रेसलाही सत्तेत वाटा
पुणे : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा (अहमदनगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा, तर उपसभापतीपदी लातूर येथील शिवसेनेचे संतोष सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली. २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पहिले अध्यक्षपद भूषविलेल्या आणि राज्यातील ३०१ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या सहकारी संघाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मार्केटयार्ड येथील सहकारी संघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला २१ पैकी १९ संचालक उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, तर निवडणूक निरीक्षक म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोकराव डख यांनी काम पाहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी नेत्यांच्या मार्गदर्शनात ही निवड प्रक्रिया पार पडली.

नवनिर्वाचित संचालक मंडळात मनीष दळवी (भाजप, मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), केशव मानकर (भाजप, भंडारा-गोंदिया), दामोदर नवपुते (भाजप, औरंगाबाद-जालना), पोपटराव सोनावणे (राष्ट्रवादी, जळगाव-नंदुरबार-धुळे), रमेश शिंदे (राष्ट्रवादी, पुणे-सातारा), अशोकराव डख (राष्ट्रवादी, बीड-उस्मानाबाद), संजय कामनापुरे (राष्ट्रवादी, नागपूर-वर्धा), संदीप काळे (राष्ट्रवादी, राखीव), रंजना कांडेलकर (राष्ट्रवादी, राखीव), पंढरीनाथ थोरे (राष्ट्रवादी, राखीव), यशवंतराव जगताप (काँग्रेस, सोलापूर-सांगली-कोल्हापूर), आनंदराव जगताप (काँग्रेस, यवतमाळ), दिनेश चोखारे (काँग्रेस, चंद्रपूर-गडचिरोली), बाबाराव पाटील (काँग्रेस, राखीव), इंदुताई गुळवे (काँग्रेस, महिला राखीव), अंकुश आहेर (शिवसेना, परभणी-हिंगोली), सेवकराम ताथोड (शिवसेना, अकोला-बुलढाणा), ज्ञानेश्वर नागमोते (शिवसेना, अमरावती-वाशीम) यांचा समावेश आहे.

निवडीबद्दल आनंद व्यक्त करत बाळासाहेब नाहाटा म्हणाले, “आदरणीय वसंतदादा पाटील यांनी बाजार समिती संघाची स्थापना केली. त्यांनी भूषविलेल्या पदावर बसण्याची संधी मला मिळाली, हे भाग्य आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही करणार आहोत. कोरोना, तसेच केंद्र सरकारने आणलेली नवी धोरणे यामुळे शेतकरी, बाजार समित्यांपुढे काही आव्हाने आहेत. विभागवार प्रश्न समजून घेत त्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ३०१ बाजार समित्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही यापुढे काम करू.”

संतोष सोमवंशी म्हणाले, “शिवसेनेला सहकारामध्ये उपसभापती पद मिळाले, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांचे, संचालकांचे आभार मानतो. या सहकारी संघात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून भाजपनेही मदत केली. राज्यातील सर्व बाजार समिती आणि राज्य शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न यापुढील काळात महासंघ करेल. पणन संचालक मंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेळगावी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे   14 डिसेंबरला अनावरण

मुंबई- केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम....

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...