पुणे- महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगाव पुणे येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुरुष गटामध्ये नाशिक संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद सातारा संघाला मिळाले. महिला गटामध्ये विजेतेपद नागपूर संघ तर उपविजेतेपद पुणे संघाला मिळाले. 20 वर्षाखालील मुले कोल्हापूर संघाला विजेतेपद तर नाशिक संघ उपविजेतेपद मिळाले मुली 20 वर्षाखालील गटात पुणे संघाला विजेतेपद तर कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आज झालेल्या स्ट्रायडर्स राज्यस्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा 2021 स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड 21 फेब्रुवारी 2021 रोजी चंदिगड पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा 2021 साठी होणार आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यांच्या 600 पेक्षा जास्त खेळाडूंचा समावेश होता यामध्ये मुली 200 पेक्षा जास्त मुले 400 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष अभय छाजेड महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सेक्रेटरी सतीश उचिल, लोकसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक पायगुडे ,विश्वेश्वर बँकेचे उपप्रबंधक राकेश कोकाटे, भानुदास साकोरे सरपंच फुलगाव, शशिकांत तळेकर आदर्श शिक्षक,तांत्रिक पंच बॅपतीस डिसूजा, अंतरराष्ट्रीय पंच किशोर शिंदे, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या गुरुबन्स कौर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेसाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या सुभाष चंद्र बोस सैनिकी विद्यालयांमध्ये दोन किलोमीटरचा धावण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला होता या मार्गावर सर्व स्पर्धा पूर्ण करण्यात आल्या. स्पर्धेसाठी तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी स्ट्रायडर्स माईल ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा संयोजन पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले यासाठी श्री चंद्रकांत पाटील व पुणे जिल्हा संघटनेचे सर्व तांत्रिक अधिकारी यांनी काम केले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ अभय छाजेड (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना) दीपक पायगुडे (अध्यक्ष लोकसेवा प्रतिष्ठान) सौ ज्योती आरडे (प्राचार्या नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल), श्री दीपक लोंढे (डायरेक्टर स्ट्रायडर्स माईल) उपस्थित होते.
निकाल पुढीलप्रमाणे-
पुरुष गट 10 किमी1 दिनेश (नाशिक) तेथेच 33 33 मिनिट 40.02 सेकंद2 आदेश नाशिक3 सुमित गोराई नाशिक4 उपेंद्र बलियान नाशिक5 रोहित यादव मुंबई सबब6 अरुण राठोड सोलापूर *महिला खुला गट* 10 किलोमीटर1 कोमल जगदाळे नाशिक( 38 मि 05.85से)2 मोनिका आठरे नाशिक3 प्राजक्ता गोडबोले नागपुर4 निकिता राऊत नागपूर5 रेश्मा केवटे सातारा6 प्राची गोडबोले नागपूर *20 वर्षाखालील मुले* 8 किमी 1 सुशांत जेधे सातारा( 27 मि.11.74 से)2 इंग्रजीत करखाते कोल्हापूर3 बाळू पुकळे सातारा4 सिद्धांत पुजारी कोल्हापूर5 प्रशांत मिश्रा ठाणे6 अभिषेक देवकर कोल्हापूर *20 वर्षाखालील मुली* ६ किमी1 प्रेमलता यादव पुणे (24 मि. 03.75 से)2 वैष्णवी सावंत सातारा3 विशाखा साळुंके सातारा4 प्राजक्ता शिंदे कोल्हापूर5 रिया दाहोत्रे नागपूर6 आकांशा शेलार सातारा *18 वर्षाखालील मुले* 6 किमी1 धुलादेव घागरे सांगली (20 मि 39 से)2 करण गधुले अहमदनगर3 निशांत सावंत सातारा4 ओमकार पन्हाळकर कोल्हापूर5 सचिन पवार परभणी6 चैतन्य रुपणार सांगली *18 वर्षाखालील मुली* 4 किमी1सृष्टी रेडेकर कोल्हापूर(16मि 23.00से)2 साक्षी जडयाल रत्नागिरी3 वैष्णवी आयवार वाशिम 4 पूर्वा शेवाळे कोल्हापूर5 सपना चौधरी पुणे6 सायली गंजाळे पुणे *16 वर्षाखालील मुले* 2 कि मी1 प्रथम पाटील कोल्हापूर (6 मि 39.04से.)2 आदित्य पाटील कोल्हापूर3 अजय महाले नाशिक4 साहिल लहाने नागपूर5 मोहित जगताप सातारा6 आहूजी घागरे सांगली *16 वर्षाखालील मुली* 2 कि मी1 साक्षी भंडारी अहमदनगरu (7मि 35.77 से)2 सानिका रुपनर सातारा3 अंजली वायसे कोल्हापूर4 वेदश्री लोणारे पुणे5 रिंकू चौधरी नाशिक6 श्रेया किरमोरे नागपूर

