परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर ही चिंतेची बाब-फडणवीस

Date:

नागपूर -परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे ही बाब निश्चितच चिंतेची आहे असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

आमची सत्ता असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र मागील वर्षभरात हा क्रमांक थेट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. मुळात यातले अनेक प्रकल्पांचे एमओयूज हे आमच्या काळातच झाले आहेत. मात्र आता पुन्हा ते होत आहेत हरकत नाही महाराष्ट्रासाठी जे चांगलं होतं आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही मागील चार वर्षात आपण पहिल्या क्रमांकाचं FDI चं राज्य केलं होतं. देशामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक चारही वर्षे महाराष्ट्रात येत होती. आता आरबीआयने जे आकडेवारी घोषित केली त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि त्याच्या मागे महाराष्ट्र आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...