प्रा. द. मा. मिरासदार यांच्या निधनाने महाराष्ट्राने लाडका साहित्यिक गमावला आहे. त्यांच्याकडून कॉलेजमध्ये मराठी शिकण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार यांनी कथाकथन लोकप्रिय केले, महाराष्ट्राला हसवले आणि विचार करायला लावले.
विद्यार्थी परिषदेत ते आमचे अध्यक्ष होते, मार्गदर्शक होते.
देशाचा शिक्षण मंत्री म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर मी पुण्यामध्ये ‘गुरु प्रणाम’ हा कार्यक्रम केला. त्यात पहिला प्रणाम मिरासदार सराना केला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर

