पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात गुंडगिरीला बळ देऊ नये असे जाहीर आवाहन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केल्याने भाजपा मध्ये हि खळबळ उडाली आहे या वक्तव्याचा समाचार रात्री भाजपाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी घेतला. ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबातील काही मंडळींनी मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ व इतर नेत्यांनी या वेळी या प्रवेशाबाबत हात वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुख्यात गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यापूर्वी कार्यक्रमांत दिसून आले आहेत. विशेष म्हणजे तडीपार असताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या गुंडांची उपस्थिती होती. मंगळवारीही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या घटना पाहता चंद्रकांत पाटील पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने नेऊ पाहात आहेत, शांत पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न का करीत आहेत, भाजपकडून आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अशा गुंड प्रवृत्तीवरच लढवली जाणार आहे का, असे प्रश्न जगताप यांनी उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने त्यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपकडून घेण्यात आला आहे.
खर्डेकर म्हणाले .’गुन्हेगार कोणत्या राजकीय पक्षाने वर्षानिवार्षे पोसलेत हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे .ज्यांच्या पक्षाचे गृहमंत्री इडी च्या चौकशीला सामोरे जाण्यास घाबरत आहेत म्हणून गायब आहेत त्यांच्याच पक्षाच्या पुण्यातील शहर अध्यक्षाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रसिद्धी साठी आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणे होय असे खर्डेकर यांनी म्हटले आहे . नेमके खर्डेकर यांनी काय म्हटले आहे ते ऐका आता त्यांच्याच शब्दात ……

