विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि ज्ञानेश्वर माऊली… तुकाराम… या जयघोषात वारकरी देहभान विसरून पंढरीच्या वाटेवर चालत आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान व विठ्ठल दर्शनाच्या ओढीने येत असलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने अवघी पंढरीनगरी हरी नामाने दुमदुमली असून भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे.
लाखो नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा
विठ्ठल नामाच्या गजरात समस्थ वारकरी भक्ती रसात चिंब भिजले होते. सावळ्या विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी आतुरलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही ओसंडून वाहत होता. यावेळी बाजीराव विहीर परिसरात माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.