रायगड – महाड आणि पोलादपूर तालुक्यांना जोडणारा नडगावे राजेवाडी दरम्यानचा सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन दगडी पूल कोसळून २ एसटी बस वाहून गेल्याची व २२ जण बेपत्ता झाल्याची घटना घडली.या पूलाची क्षमता संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने सरकारी यंत्रणेला ३ वर्षांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे सरकारने या पूलाशेजारी दुसरा समांतर पूल बांधला. तरीही या जुन्या पूलावरील वाहतूक स्थानिक प्रशासनाने अथवा राष्ट्रीय महामार्ग विभागाने बंद केली नाही. आता अनेकांचे बळी गेल्यावर अशा पुलांची तपासणी दुरुस्ती करण्यासाठी समित्या नेमल्या जातील आणि करोडोची टेंडर्स हि निघतील . पण मेल्या शिवाय सरकार चे लक्ष जात नाही अशी महाराष्ट्रातील स्थिती आहे काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे .
ब्रिटीश एजन्सीने सरकारी यंत्रणेला ३ वर्षांपूर्वीच सांगूनही महाड-पोलादपूर पूल सुरूच होता …
Date:

