मुंबई – आज ‘स्वच्छ भारत अभियान’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बिग बी अमिताभ बच्चन सहभागी झाले होते . मुंबईतील रस्त्यावर हातात झाडू घेऊन उतरत बिग बीने रस्ता साफ केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत
अमिताभने जे. जे. रुग्णालयाच्या परीसरात सफाईचे काम केले. अमिताभने याची माहिती आपल्या ट्वीटरवरुन चाहत्यांना दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ‘स्वच्छ भारत अभियान’चे काही फोटो आपल्या ट्विटरवरसुद्धा शेअर केले आहेत.




