पुण्यातील स्टुडिओ-एम मध्ये होणार आयोजन
पुणे: पुण्याच्या माधुरी भादुरी गेल्या चार दशकांपासून एक विख्यात कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे काम भारतातील आणि परदेशातील 36 पेक्षा जास्त सोलो आणि 72 ग्रुप प्रदर्शनांद्वारे प्रदर्शित केले गेले आहे. कलेची जाण असलेल्या विवेकी व्यक्तींच्या कला संकलनाचा त्या भाग बनल्या आहे.
माधुरी भादुरी यांनी पुण्यातील ‘स्टुडिओ-एम’ या त्यांच्या स्टुडिओमध्ये ‘कॅनव्हास अँड बियॉंड‘ या शोचे अनावरण केले. या शो मध्ये रिफ्लेक्शन, होरायझोन व ग्लिम्प्स सारख्या श्रेणींमधील माधुरी यांच्या कलाकृती संकलित करून प्रदर्शित केल्या होत्या. या विशेष प्रसंगी सुमनताई किर्लोस्कर, ज्योती अगरवाल, अल्पना किर्लोस्कर, सुनीता कल्याणी, संध्या व अमोल पालेकर सारख्या दिग्गजांनी उपस्थिती लावून दीपप्रज्वलन केले.
माधुरी यांची रिफ्लेक्शन सिरीज ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट क्लोड मोने यांच्या वॉटर लिलीजची आठवण करून देणारी आहे. पाऊस आणि पाणी वापरून कलाकाराने संशोधनासाठी घेतलेल्या मेहनतीला दर्शविते. या सिरीज मध्ये प्रकाश आणि सावलीच्या विस्मयकारक परस्परक्रियातील क्षणभंगूर, क्षणिक आणि प्रभाववादी गुण दर्शविणारी आहे. शहरातील आयुष्याचे मोहक पैलुंवर प्रकाश टाकणारी होरायझोन सिरीज त्यांच्या रिफ्लेक्शन सिरीज सारखीच खूप प्रभावशाली आहे. शहरातील विविध रंग व छटा उलगडणारी ही सिरीज थोडी अवास्तविक वाटली तरी नयनरम्य नक्कीच आहे.
धातूच्या टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या कलाकृती ज्यांना माधुरी असेम्ब्लेजेस असे संबोधतात व झोपड्यांच्या छतांचा पॅचवर्क देखील त्यांनी प्रदर्शित केले आहे. ह्या प्रदर्शनात द एम्बर्स सिरीज मधील अत्यंत सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं नाइट लॅम्प, झूमर, टेबल लॅम्प व टी- लाइट होल्डरचे अद्वितीय नमुने झळकत होते.
माधुरी यांनी द मायरड्स कलेक्शन मधील सॅटिन, सिल्क कुशन व टेबल मॅट्स खूप विशिष्ट व आधुनिक पद्धतीने डिझाइन केल्या आहेत. त्यांनी रंगविलेले म्युसिंग्स सिरीज म्हणजेच स्टँडअलोन फायबर कास्ट स्कल्पचर देखील अत्यंत मोहक आहेत. अत्यंत सुंदर खुर्च्या व कॉफी टेबल असलेली मिलांज सिरीज सुद्धा देखणी आहे. मेटॅलिक सीरीजमधील अत्यंत सुंदर आणि बोलके म्युरल, खुर्च्या व फिगरीन्स सहज लक्ष वेधून घेतात.
रिफाईंड इम्प्रेशनिस्टिक लँडस्केप हा माधुरी यांचा ट्रेडमार्क बनला आहे. त्यांचा आजवरचा प्रवास फक्त कलाकार म्हणूनच नाही तर एक परिपूर्णतावादी म्हणूनही राहिलेला आहे. माधुरी यांच्या मते कला हा एक सुंदर अनुभव आहे.

