पुणे-बरीच महिने प्रतीक्षा केल्यावर वजोर डॉट कॉमच्या प्रेमींना अखेर दिलासा मिळाला आहे. वजोर डॉट कॉमचे पहिले वहिलेस्टोअर मॉडेल कॉलोनी येथील पॅविलीयनला आज उघडण्यात आले. वजोर डॉट कॉमची क्रेझ फॅशन प्रेमींमध्ये मोठ्याप्रमाणात आहे. ह्या प्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे वजोर डॉट कॉमने आपले ऑफलाइन स्टोअर काढण्याचे ठरविले.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युसर फ्रेंडली शॉपिंग ही वजोर डॉट कॉमची खासियत असणार आहे.
वजोर डॉट कॉमच्या ग्राहकांना ह्या स्टोअर मध्ये येणे हा एक अनोखा अनुभव असणार आहे. हे स्टोअर १८०० स्वेअर फुटजागेत उभारले गेले आहे. उद्घाटनाला अनेक बड्याबड्या मंडळींनी हजेरी लावली होती त्यात बरीच प्रभावी मंडळी, आदरणीयसदस्य, ब्लॉगर्स, मिडिया प्रोफेशनल, आणि अनेक प्रामाणिक ग्राहकांचा समावेश होता. ग्रीनर आणि क्लीनर प्लॅनेटवर प्रचंडविश्वास आणि श्रद्धा असल्याने वजोर डॉट कॉमने सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक रोपटे देऊनआपली कृतज्ञता व्यक्त केली. हे रोपटेही त्यांनी वाढताना बघावे जसे त्यांनी वजोर डॉट कॉमला पहिले असा त्यामागचाविचारही त्यांनी बोलून दाखविला.
वजोर डॉट कॉम आजतागायत आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि स्पष्ट राहिले आहे. फॅशन ही आता फक्त एक उपयुक्तवस्तू नसून त्याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळेच ग्राहकांना ३६० डिग्री शॉपिंगचा अनुभव मिळावा म्हणून वजोरडॉट कॉम ऑफलाइन आले आहोत. ह्यात त्यांचे सिग्नेचर फॅशन आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स आहेत.
वजोर डॉट कॉमचा एक अनोखा उपक्रम आहे ज्यात प्रत्येक महिन्याच्या कलेक्शनमागील स्टोरी प्रत्येक सेक्शन कथनकरेल. प्रत्येक वजोर डॉट कॉमच्या स्टोअर मध्ये टचस्क्रीन्स असून त्यात ग्राहक ब्रान्डचा वर्चुअल टूर घेऊ शकतात वकुठल्याही प्रकारचे ट्रांसाक्शन करू शकतात. ग्राहक सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स येथील स्क्रीनवर बघून ते ऑफलाइन किंवाऑनलाइन मागवू शकतात.
सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी ब्रांडचे कपडे, ज्वेलरी, फूटवेअर आणि अॅक्सेसरीज बघितले. वेजर डेकोरहीप्रत्येक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे स्टोअर रोज आठवड्याचे सातही दिवस ८ ते १० या वेळेत सुरु राहील.
वजोर डॉट कॉम २०१८ मध्ये चेन्नई आणि दिल्लीत उघणार असून ३–४ देशात देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलाविस्तार करण्याच्या तयारीत आहे.