भीमथडी जत्रेसे उत्साहात सुरवात, पुणेकरांकडुन पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद
पुणे – ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १२ वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते. ही जत्रा २२ ते २५ डिसेंबर पर्यंत अॉग्रीकल्चरल ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे सुरू राहील
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आणि अन्य मान्यवरच्यां हस्ते भीमथडीचे 22 डिसेंबर रोजी उद्घाटण झाले. यात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलिस उपमुख्य अधिकारी ज्योती प्रिया सिंग, येरवडा जेलच्या प्रभारी स्वाती साठे, अनाथांसाठी काम करणा-या सामाजिक कार्यकर्ता माननीय सिंधुताई सपकाळ, अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रेमळ परोपकारी अश्या सुमाताई किर्लोस्कर, आदरणीय वेदांती राजे भोसले, वर्षा चोरडिया – अध्यक्ष, फिक्की फ्लो पुणे चाप्टर, ह्या सर्व महिलांच्या हस्ते सकाळी १० वाजता भिमथडीचे उद्घाटण झाले.
महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या अकरा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.
मागिल वर्षी देखील भीमथडीस प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला, १ लाखांहूनही अधिक लोकांनी भीमथडीची विविधतेने नटलेली संस्कती अनुभवली. ह्या वर्षी देखील३०२ हून अधिक ग्रामिण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळाले आहेत.या वर्षीच्या भीमथडी जत्रेचं वेगळेपण/ आकर्षण म्हणजे भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते. यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे रात्रीचा ‘भिमथडी सिलेक्ट फॅशन शो ‘ आणि लहाण मुलांसाठी खास ख्रिसमस विशेष “पेटिंग झू “.
पल्लवी दत्ता यांच्या संकल्पनेतुन साकारलेली भिमथाडी सिलेक्ट थिम ह्यावर्षी पहावयास मिळेत ज्यात फॉशन चे अनोके 20 स्टॉलचा एक विशेष विभाग आहे. येथे भारतातील पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पुनरुज्जीवन व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. सौ.पल्लवी दत्तांनी सध्याच्या काळात भारतातील फॅशनच्या असंख्य रूचकीय पैलूंना शोधले आहे .लॅक्मे फॅशन वीक समर / रिसॉर्ट 2017 मध्ये सस्टेनेबल फॅशन आणि इंडियन टेक्सटाइलसाठी फॅशन डॉक्युमेण्ट्रीयनच्या त्या सर्वेसर्वा होत्या.
सांगतिक कार्यक्रम / कॉन्सर्टस देखील ह्या वर्षी असतील .ज्यात रघू दिक्षित प्रोजेक्ट आणि रेसोनन्स आपली संगीत कला भीमथडी जत्रेत सादर करणार आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता रघू दिक्षित आणि २२ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता रेसोनन्स चे वैभव जोशी आणि अंजली मराठे आपली कला प्रस्तृत करतील . ह्या कॉन्सर्ट द्वारे महाराष्ट्रीय संस्कृती समझुन घेणे अानखी सोपे होईल. यंदाचा ह्या १२ व्या महोत्सवास देखील दरवर्षी प्रमाणेच पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळेत.
टेक्नोसॅव्ही आणि रिचेबल भीमथडी जत्रा-
या इंटरनेटच्या युगात भीमथडी जत्राही ‘टेक्नोसॅव्ही’ झाली आहे. तुम्ही या जत्रेतील विविध उपक्रम, कॉन्सर्टस् आता इंटरनेटवरून बुक करू शकता.
www.bookmyshow.com या संकेतस्थळावरून आपले टिकीट कन्फर्म करू शकता. ऑनलाईन पे करू शकता. पुण्यातील कोणत्याही भागातून भीमथडी जत्रेला येण्यासाठी ‘UBER’ टॅक्सी बुक केल्यास 30 टक्के प्रवास भाड्याची सुट देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही ‘JATRA17’ हा कोड ‘UBER’ बुक करताना वापरा.