जुन्या कपड्यांच्या बदल्यात मिळवा गिफ्ट व्हाऊचर्स
पुणे-मार्क्स अॅण्ड स्पेन्सर कंपनीच्या मते जुन्या कपड्यांना चांगल्या कारणांसाठी वापरता येऊ शकते. त्यांना फेकण्यापेक्षा चांगल्या कारणांसाठी आणि रिसायकल मध्ये परत वापरता येऊ शकते.
मार्क्स अॅण्ड स्पेन्सर (एम एंड एस) ह्या विख्यात ब्रिटीश रिटेलर कंपनीने गूंज संस्थेबरोबर हिस्सेदारी केली आहे, ज्यात कंपनी ने अपल्या ग्राहकांसाठी क्लोथ्स एक्सचेंज प्रोग्रॅमची सुरूवात केली आहे. पुण्यामध्ये मार्क्स अॅण्ड स्पेन्सरच्या प्रत्येक दालनात ३१ डिसेंबर पर्यंत क्लोथ्स एक्सचेंज प्रोग्रॅम सुरू राहील. ह्या उपक्रमाअंतर्गत गुंज संस्था ह्या जुन्या कंपड्यांर प्रक्रिया करेल.
कंपनीं ने आपल्या ग्राहकांस कोणत्याही ब्रांडचे जुने कपडे न फेकता त्यांना भारतभरातील मार्क्स अॅण्ड स्पेन्सरच्या स्टोअर्स मध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे. जुन्या कपड्यांच्या बदल्यात कंपनी ग्राहकांना ६०० रूपयांचे व्हाऊचर्स देईल हा उपक्रम दिल्ली, बंगलूरू, हैदराबाद, गुडगाव, गोवा, अमृतसर, चंडीगड, लुधीयाना, जयपूर, मोहाली, विजयवाडा, कोइम्बतूर, कोलकता, चेन्नई आणि आता पुणे शहरांमधील ३९ दालनांमध्ये राबविण्यात आला आहे.
मार्क्स अॅंड स्पेंसर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स मुन्सन म्हणले कि क्लोथ्स एक्सचेंज उपक्रम भारतामध्ये प्रस्तृत करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतच्या महत्वपुर्ण सामाजीक आणि पर्यावरणीय समस्यांसाठी आम्ही नुकताच प्लान ए २०२५ योजना प्रस्तृत केली आहे, ज्यातील एक आहे क्लोथ्स एक्सचेंज प्रोग्रॅाम जो की एक महत्वपुर्ण उपक्रम आहे.
गुंजचे संस्थापक अंशू गुप्ता म्हणाले कि, ग्रामीण भारतामध्ये सुरू काही विकासकायांशी जोडण्याची संधी म्हणुन लोक याकडे पाहतील.
मार्क्स अॅण्ड स्पेन्सर इंडियाचे सस्टेनिबिलीटी विभागाचे प्रमुख टी.जी.गणेश म्हणाले कि एम.एंड.एस चा प्लॅन ए २०१५ मोहिमेच्या माध्यमातुन जुन्या कपड्यांची संख्या कमी करने आमचा उद्येश्य आहे.