सिम्बायोसिस स्किल्स अँण्ड ओपन युनिव्हर्सिटी द्वारा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष फी सवलत योजना

Date:

पुणे-सिम्बायोसिस स्किल्स अँण्ड ओपन युनिव्हर्सिटी (एसएसओयू), पुणे  पहिल्यांदाच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये विशेष सवलत प्रदान करीत आहे. सिम्बायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामधील प्रथम कौशल्य विकास विद्यापीठ आहे, जे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या जवळ किवळे येथे स्थित आहे. या विद्यापीठामध्ये ऑटोमोबाइल, कंस्ट्रक्शन, मॅकॅट्रोनिक्स असे इंजिनियरिंग, रिटेल, सप्लाय चेन मॅनेजमेंट इ. मॅनेजमेंटचे डिग्री, सर्टिफिकेट, तसेच ब्यूटी अॅण्ड वेलनेस व डेटा सायन्स मध्ये बीएससी इ कोर्सेस उपलब्ध आहेत.

डॉ.स्वाती मुजुमदार, प्रो-चांसलर सिम्बायोसिस स्किल्स अँण्ड  ओपन युनिव्हर्सिटी म्हणाल्या की, या विद्यापीठाची स्थापना कौशल्य आधारित शिक्षण प्रदान करण्याच्या हेतूने करण्यात आली आहे जे आपल्या देशातील तरुणांना उद्योगासाठी तयार करेल. सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी पहिल्यांदाच पुणे य़ेथे आर्थिक दृष्या वंचित विद्यार्थ्यांना कमी शुल्कात इंजिनियरिंग व मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रात शिक्षण मिळावे यासाठी योजना घेऊन आले आहे.  या योजनेअंतर्गत गरजू व योग्यता असणार्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्वक शिक्षण मिळू शकेल. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकूण शुल्काच्या  ६० टक्के पर्यंतच्या सवलतीमुळे सिंबायोसिसमधून पदवी घेणे शक्य होईल.
डॉ. स्वाती पुढे हे ही म्हणाल्या की शिक्षण ही एक सामाजिक चळवळ आहे . शिक्षणाचे व्यापारीकरण होत आसताना सिम्बायोसिसने घेतलेला हा पुढाकार एक सामाजिक आंदोलन आहे. तसेच त्यांनी सांगितले की त्यांचा अभियांत्रिकी (बी टेक) प्रोग्राम, ज्याचे शुल्क प्रति वर्ष रू 2,45,000 आहे ते आता 1,10,000 पर्यंत जाईल. याशिवाय या योजनेत (बीबीए) प्रोग्रामचे शुल्क  दर वर्षी रू 2,35,000 / – आहे, तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ते रु .1,00,000 / – असेल. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी मुलींना रु. 10,000 / – अतिरिक्त सवलत दिली जात आहे. याचबरोबर वसतिगृह आणि मेससाठी विशेष  सवलत देण्यात येत आहे. वंचिताना शैक्षणिक संधी देण्यासाठी विद्यापीठाने अस अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.


सिम्बायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटी ने फिएट इंडिया लिमिटेडबरोबर एकत्र येऊन ग्रामीण भागामध्ये वंचित मुलींसाठी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोफत डिप्लोमा देण्यासाठी सहयोग केला आहे. तसेच 2 वर्षाच्या  या कार्यक्रमात
त्यांना प्रशिक्षित करुन नोकरीच्या संधी प्रदान केल्या आहेत.सिंबायोसिस स्किल अॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नाव, संपर्कासाठी नंबर व पत्ता ७७९६६३८३७७ या नंबर वर व्हॉट्स अॅप करावे तसेच आधिक माहितीसाठी www.ssou.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी किंवा प्रवेशासाठी ८००७००१७७७ , २०-२७१८७७६८ या नंबरवर संपर्क साधावा.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...