पुणे– हसते- खेळते लहानपण आणि बालपणच्या आठवणी नेहमीच सर्वांसाठी खास असतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. अश्याच बालपणीची आठवणींना उजाळा देत गंगाधम टॉवर्स येथे माईंड व्हेंचर्स आंतरराष्ट्रीय पुणे स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित केला आहे. हे फेस्टिव्हल यावर्षी गंगाधम चौक, मार्केट यर्ड येथे आयोजित होणार असुन फेस्टिव्हलचे हे तिसरा वर्ष आहे.
या स्ट्रीट फेस्टमध्ये लहान मुलांसाठी बर्याच प्रकारच्या खेळांचे आयोजन केले गेले आहे, ज्यात जिप जॅम अॉन सायकल, पेप्पी जुम्बा बीट्स, हॉपस्कॉचिंग, ड्रम सर्किल, विशाल साप-सीढ़ी, स्व निर्मित अॅडवेंचर, कॅनवास स्प्रे आदिंचा समावेश असेल.
‘पुणे स्ट्रीट फेस्टिवल’ हा लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बनविलेला एक विशेष स्ट्रीट अनुभव आहे, ज्यात सर्व माता-पिता आपआपल्या मुलांसोबत सहभागी होतील हा अनुभव त्यांच्यासाठी निश्चीतच संस्मरणिय ठरेल. येथे आयोजित पारंपरिक आणि लहानपणीचे खेळ, ड्रम, संगीत, नृत्यकला आणि अॅडवेंचर सारख्या गोष्टी मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास देखील करतात. या वर्षी हा स्ट्रीट फेस्टिव्हल जवळपास १ किलोमीटर वर्गक्षेत्रात असेल, ज्यात गंगाधाम चौक आणि वर्धमान पूरा सोसाइटी देखील आहे. मागिल दोन सत्रांमध्ये २००० पेक्षाही अधिक लोकांनी या फेस्टमध्ये सहभाग घेतला होता. रोशन शेट्टी येथे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहतील.
माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनलचे संस्थापक लकी सुराना द्वारा आयोजित या फेस्टिव्हलला राउंड टेबल इंडिया आणि अर्ली चाइल्डहुड असोसिएशन ने देखील सहयोग दिला आहे. माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनल ने अधिकारी, प्रशासन, वाहतुक पोलिस आणि विभिन्न स्थानीक लोकांसोबत भागीदारी केली आहे.
माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनलचे संस्थापक लकी सुराना द्वारा आयोजित या फेस्टिव्हलला राउंड टेबल इंडिया आणि अर्ली चाइल्डहुड असोसिएशन ने देखील सहयोग दिला आहे. माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनल ने अधिकारी, प्रशासन, वाहतुक पोलिस आणि विभिन्न स्थानीक लोकांसोबत भागीदारी केली आहे.
कधी: रविवार, २० जानेवारी २०१९
वेळ: सकाळी ७ वाजता सुरू
प्रवेश: सर्वांसाठी विनामूल्य
9822268298 / 98237 66614



