रेसिडेन्सी क्लबचे पुणे प्राईड अवॉर्ड्स संपन्न
पुणे- रेसिडेन्सी क्लबची नुकतीच २६ वर्ष पूर्ण झाली असून पुणे प्राइड अवार्ड्स हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा रेसिडेन्सी क्लब ब्रह्माकॉपचे अध्यक्ष आर.के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विवध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि पुणे शहरासाठी अभिमानस्पद अश्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला, आणि त्यांना पुणे प्राइड अवार्ड्सने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मुख्य अतिथी डॉ. बाबा कल्याणी ह्यांचा परिचय पद्मश्री लीला पूनावाला ह्यांनी करुन दिला. ह्यानंतर लगेचच आर.के अग्रवाल यांनी डॉ. बाबा कल्याणी आणि डॉ. अजय चंदनवाले ह्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
आर.के अग्रवाल यांनी सोहळ्याची सुरुवात मान्यवरांचे स्वागताने केली. डॉ.अजय चंदनवाले ह्यांनी आपल्या भाषणात सोहळ्याचे भरभरून कौतुक केले.
मुख्य अतिथी डॉ. बाबा कल्याणी ह्यांच्या हस्ते श्रीमती सुमित्रा भावे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
देशाच्या सुरक्षिततेसाठी शहीद झालेल्या शूर सैनिकांच्या पत्नींना कर्नल. संभाजी पाटील यांच्या हस्ते शिलाई मशीन देऊन गौरविण्यात आले.
गौरविण्यात आलेल्या व्यक्ती-
कॉर्पोरेट: हनमंत गायकवाड
समाज कार्य:डॉ. विनोद शहा
कला आणि संस्कृती: श्री. उसमान खान
शैक्षणिक : प्रा. एम. एस. वाडिया
खेळ:गौरी गाडगीळ
जीवन गौरव: सुमित्रा भावे
सल्लागार मंडळ सदस्य
1. डॉ. एस. बी. मुजुमदार
2. विठ्ठल मनियार
3. डॉ. के. एच. संचेती
4. लीला पूनावाला
5. संभाजी पाटील
6सबिना संघवी
7. व्ही. एम. मसके
8. सुभाष सनस
9डॉ. मोहन आगाशे
10. चंद्रकांत बोर्डे