पुणे: विशेष स्टाइलिश आणि ग्लॅमरस फॅशन शो, पुणे टाइम्स फॅशन वीक- 2018या वर्षी पुण्याील वेस्टिन हॉटल,कोरेगाव पार्क मध्ये आयोजित करण्यात आला होता. पुणे टाइम्स फॅशन वीक अंतर्गत पुण्यामध्ये तीन दिवसीय फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
फॉशन शोचे उद्घाटन प्रिआ कटारियाच्या शो ने झाले. शैना एन सी, प्रणव प्रताप भागवत, सोफी, स्नेहा अदवानी, शालाका पंडित, उल्का बाफना वोहरा, डिंपल मजीठिया, वैशाली कराड, आशीष आणि शेफाली, श्रुति मंगाेश आणि अर्चना कोचर सारख्या डिजाइनर ने यावेळी अपले नवीनतम कलेक्शन सादर केले. याव्यतरिक्त पीएनजी ज्वेलर्स आणि आईएसएएस इंटरनॅशनल ब्यूटी स्कूलचा शो देखील यावेळी पहावयास मिळाला.
पुणे टाइम्स फॅशन वीक मध्ये बॉलीवुड आणि फॅशन जगतातील आकर्षक चेहरे देखील शो स्टॉपर्सच्या रूपात उपस्थित होते. ज्यात स्वरा भास्कर, सोनाली कुलकर्णी, चित्रांगदा सिंह, कुणाल कपूर, भारती सिंह, प्रिया बापट, संस्कृती बालगुडे, सई तमजंकर, अलंक्रिता सहाई, नॉयनीता लोध होते. याचबरोबर प्रसिद्ध डिज़ाइनर आणि सुपर मॉडल दीप्ति गुजराल आणि कैंडिस पिंटो देखील इस कार्यक्रमावेळी दिसले.



