७ वे इंडिया सुपरबाईक फेस्टिवल पुण्यात लवकरच
पुणे: भारतातील सर्वात मोठा आणि ज्यासाठी सर्व बाईकप्रेमी उत्सुक असतात असा फेस्टिवल म्हणजेच इंडिया सुपरबाईक फेस्टिवल (आएसएफ) आपल्या ७ व्या आवृत्तीसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आयएसएफ हा सर्वात लोकप्रिय सुपरबाइक फेस्टीवल आहे जो अमनोरा पार्क टाऊन, ओपन ग्राउंड, पुणे येथे होणार आहे. शनिवार दिनांक १६ डिसेंबरला दुपारी ३ ते रात्री १० आणि रविवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत हा महोत्सव सुरू राहील. कार्यक्रमाचे आयोजक आणि सुपर बाईकर अमोल तळपदे यांनी आज ही माहिती जाहीर केली.
“आयएसएफ हा 600 सीसी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक प्रस्तृत करणारा भारतातील पहिला सुपरबाइक फेस्टीवल आहे. सुपरबाईकचे मालक येथे आपल्या वैविध्यपूर्ण आणि खास बाईक आणतात. ह्या प्रदर्शनात बाईकप्रेमींद्वारा बाईकमध्ये केलेल विविध प्रयोग, संपूर्ण भारतातुण आलेल्या अनोख्या बाईक आणि बाईकमध्ये केलेले विभिन्न आविष्कार पहावयास मिळतात.
या प्रसंगी बोलताना आयोजक तळपदे यांनी सुपरबाईक मालकांच्या सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “आपल्याला सुपरबाईकची योग्य काळजी घेणे व सुरक्षिततेसह चालवणे आवश्यक आहे कारण राइडर आणि त्याच्या सभोवतालचे लोक हे अतिशय धोकादायक असू शकतात.”
आयएसएफच्या ७ व्या आवृत्तीमध्ये भारतीय सुपरबाईकर्स, बाइकिंग क्लब आणि क्लब्स भाग घेतील यात सर्वोत्कृष्ट ऍक्सेसराइझ्ड मोटरसायकल, किंग ऑफ बर्नआऊट, लाऊडेस्ट मोटरसायकल अशा वेगवेगळ्या श्रेणींच्या बाईक सहभागी होणार आहेत जसे की 600 सीसी ते 800 सीसी, 800 सीसी ते 1000 सीसी आणि 1000 सीसीपेक्षा जास्त. वर्ष 2017 चे सुपरबाईकरचे शीर्षके जिंकण्यासाठी सर्व सुपर बाईकर्स मध्ये कठीण लढत होऊ शकते.
२०१२ मध्ये सुरु झाल्यापासूनच हा फेस्टीवल भारतातील सुपरबाइक आणि सुपरकार मालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला होता. गेल्या काही वर्षांमध्ये तो पेट्रोलपंपांवरली मेक्का बनला आहे आणि आज मोठ्या संख्येने बाइकिंग प्रेक्षकांना आकर्षित करते . हा कार्यक्रम भारतातील सर्वात लोकप्रिय ऑटो शो म्हणून ओळखला गेला आहे.
ह्या इव्हेंटमध्ये आपल्या पाहुण्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर देखील विशेष लक्ष दिले जाईल आणि एफ एंड बी आणि फूड ट्रकची सर्व व्यवस्था करण्यात येईल.
तारीख: – शनिवार 16 डिसेंबर – दुपारी 3 ते 10
रविवार 17 डिसेंबर – सकाळी 11 ते रात्री 10
स्थळ-अमनोरा टाऊन सेंटर मॉल – ओपन ग्राउंड, मगरपट्टा, पुणे