स्वदेशी कपडे, स्वदेशी फॅशनला चालना
खेड्यातील कारागीर आणि हातमागाला चालना देत आहे इंडिया इम्प्रीनट्स.
पुणे-पुण्यामध्ये नुकतेच एक आगळे वेगळे आणि अनोखे दुकान उघडले आहे ज्याचे नाव आहे इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints). ह्या दुकानात वेगवेगळ्या भारतीय ब्रांडच्या संपूर्ण स्वदेशी आणि भारतीय जीवनशैलीच्या वस्तू उपलब्ध आहेत. भारतीय हातमागाला चालना देणारे आणि भारतीय कारागिरांना प्रोत्साहन आणि रोजगार देण्याचे महत्वाचे काम ह्यातून होत आहे.
येथे मिळणाऱ्या सर्व वस्तू भारतीय कारागीरांनी बनविलेल्या आणि भारतीय संस्कृतीशी ताळमेळ साधत भारतीय जीवनशैलीशी समतोल राखणाऱ्या आहेत. यातुनच स्वदेशी कपडे, स्वदेशी फॅशन, स्वदेशी हातमाग आणि पारंपारिक भारतीय कारागीरांना देखील चालना मिळत आहे .
येथे भारतीय ब्रान्डच्या, संपूर्णपणे स्वदेशी आणि अन्यत्र कोठेही पाहावयास मिळणार नाहीत अशा अनन्यसाधारण साड्या, दुपट्टे वगैरे कपडे आपणास पाहावयास मिळतील ज्या भारतातील दूर दूरच्या खेडेगावातील कारागिरांकडून बनवून घेतलेल्या आहेत. काही अनन्य साधारण साड्या अशाही आहेत की ज्यावर रामायण, महाभारत, पंचतंत्र मधील काही गोष्टी हाताने रंगविलेल्या (hand painted) आहेत. साडीसाठी, दुपट्ट्यासाठी वापरले जाणारे कापड देखील हाताने विणलेले आहे. भारतीय कलेला जपणारे आणि भारतीय कारागिरांचा आदर करणारे असे हे दुकान पुण्यात प्रभात रोड, गल्ली नं ८ मध्ये दिमाखात सुरु झाले आहे.
ह्या दुकानात वेगवेगळ्या ब्रांडच्या भारतीय कारागिरांनी बनवलेल्या वस्तू विकायला तर आहेतच परंतु वर्षभर तेथे सतत वेगवेगळ्या कार्यशाळा देखील भरवील्या जातात जसे की “दाबू प्रिंटींग” कसे केले जाते ह्यावर कार्यशाळा, “गोमी तेनी” ह्या उत्तर कर्नाटकातील संस्कृतीतील साड्या इत्यादी प्रकारच्या कार्यशाळांना लोकांनी प्रचंड मोठा प्रतीसात दिलेला आहेच. ह्यातून लोकांना भारतीय कालेबाद्दल्चे प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रात्याक्षिके पाहायला मिळतात. अशा ह्या निरनिराळ्या कार्यशाळा वर्षभर आयोजित करण्यात येतात.
त्याच प्रमाणे इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints) ह्या आगळ्या वेगळ्या भारतीय कलेवर आधारित सुरु झालेल्या दुकानात, ग्राहकांसाठी एक वेगळाच अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्नही केला गेला आहे जसे की – तेथे एक छोटीशी पुस्तकांची लायब्ररी आहे ज्यात भारतातील निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत “भारतीय कला”, “भारतीय पाककला”, “भारत अर्थशास्त्र”, “भारतिय राजकारण” अशी भारताशी संबंधित निरनिराळी पुस्तके उपलब्ध आहेत की जी इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints) च्या सभासदांना तेथेच बसून वाचताही येणार आहेत. दर तिमाहीला ही पुस्तके बदलली जातात जेणेकरून सभासदांना निरनिराळ्या वीशयवरिल साहित्य वाचायला मिळते आहे.
हे दुकान दोन स्त्रियांनी – सौ. अपर्णा मिलिंद फडके आणि सौ. केतकी आशिष अन्नछत्रे यांनी सुरु केले आहे जे महीला सशक्तिकरणाच्या दृष्टीने देखील हे दुकान खूप महत्वाचे आहे.तर या, इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints) ह्या दुकानाला सकाळी १० ते सायंकाळी ७:३० ह्या वेळात भेट द्या आणि भारतीय संस्कृती, परंपरा, वारसा आणि कारागिरी जपण्यास आपलाही मौल्यवान हातभार लावा.